पावभाजी-1

तिने ठरवलं होतं..

या नात्यातून काही दिवस बाहेर पडायचं..

समोरच्याला जाणीव होईपर्यंत..

अगदी शांततेत..

कुठलीही शाब्दिक चकमक नको..

कसलाही तंटा नको..

लग्नाला 2 वर्ष होत आलेली,

कुटुंब मोठं..

सतत नातेवाईकांच्या गराड्यात..

चुलतभाऊ, मामेभाऊ, मावसभाऊ, बहिणी, माम्या, मावश्या..

सतत घरात राबता..

त्यांचं करण्यात नवऱ्याचा किमान अर्धा दिवस तरी जाई..

मावशीला स्टॅंडवर आणायला जा..

आत्याला नाक्यावर सोडून ये..

भावाला परीक्षा केंद्रावर सोडून ये..

आत्यासोबत पत्रिका वाटायला जा..

ते संपत नाही तोच..

घरी सासूबाईंच्या मागे पळ..

सासऱ्यांची कामं..

***

भाग 2
भाग 3

2 thoughts on “पावभाजी-1”

Leave a Comment