दुनिया गोल है-3

 ती म्हणाली, चल माझ्यासोबत.. त्या पत्त्यावर जाऊन येऊ..

सासूबाईही आवेशात आल्या,

भेटला की चांगलं झापते त्याला,हा असा बिझनेस करतात का? आज इतक्या महत्वाच्या दिवशी ग्राहकाची अशी फजिती करताना लाज नाही वाटत का या लोकांना?

हो ना, मी ऐकलं होतं खूप छान केक बनवतात, पण नुसतं बनवून काय उपयोग? सर्व्हिस पण द्यायला हवी ना चांगली.. मैत्रीण अजून चिडून बोलत होती..

दोघींनी त्या केक वाल्याला चांगलं झापायचं ठरवलं..

दोघीही गेटबाहेर निघणार तोच समोरून एक बाई केक आणि इतर ऑर्डर घेऊन आली..खूप दमली होती, धाप टाकत आत येत होती, 

होय, निमाच होती ती..

तिलाच ऑर्डर दिलेली,

दोघीही एकमेकींना ओळखत नव्हत्या,

ती समोर येताच सासूबाईंच्या मैत्रिणीने विचारलं,

Cake bake तुझंच का? मी माणूस समजत होते, असो..किती उशीर? कार्यक्रम सुरू होत आलाय..

तिने सासूबाईंकडे पाहिलं, त्या नजर खाली घालुन उभ्या होत्या..

निमा म्हणाली,

“सॉरी माझ्यामुळे लेट झालं..”

काय लेट, अशी सर्व्हिस देता का?ग्राहकाची फजिती करणार? मान्य की घरी कामं असतात बायकांना, पण प्रायोरीटी कशाला द्यावी हे कळायला हवं बिझनेस करताना? हो की नाही गं? 

मैत्रीण सासूबाईंकडे बघत म्हणाल्या,

ह..हो…हो..

तेव्हा तर फार बडबड करत होतीस, चांगली झापेल वगैरे, आता काय झालं? 

अगं माझी सून आहे ती..

हो, मी यांची सून, आणि सॉरी, खरं तर सासूबाईंच्या साडीला इस्त्री करत आणि त्यांच्या ऑर्डर पूर्ण करण्यातच वेळ गेला म्हणून वेळ झाला..

निमानेही संधी सोडली नाही..

काय गं? खरं बोलतेय का ही? अगं सुनेचा इतका छान व्यवसाय असताना तिला मदत करायची सोडून वर कामं सांगतेस? आज जर अजून लेट झालं असतं आणि नंतर मला कारण कळलं असतं ना तर तुलाच जबाबदार धरलं असतं मी..असो, चल आता..

सुनबाई निघून गेली,

कार्यक्रम पार पडला..

ज्या कार्यक्रमात आपली छाप पडावी म्हणून सुनेला धारेवर धरलं, त्याच्यामुळेच आज त्यांचा मैत्रिणीने अपमान केला..

दुनिया गोल है बॉस..

घुमके सब वापीस आता है !

समाप्त

9 thoughts on “दुनिया गोल है-3”

  1. थोड लॉजिकल हव अजून, केक आणि इतर गोष्टी दीड तासात पूर्ण होत नाहीत 4-5 तास लागतात सेट व्हायला..

    Reply

Leave a Comment