माहेर-1

मोठया सूनबाईला बाळंतपणासाठी माहेरी सोडायला सासरचे सर्वजण गेले होते,

पहिलंच मूल,

बाळंतपण सासरी होऊ द्या, आम्ही तिचं सगळं करू असा हट्ट करूनही तिच्या माहेरच्यांनी ऐकलं नाही,

सासरच्यांनीही म्हटलं,

जाऊद्या शेवटी माहेर ते माहेरच..

घरातुन नवरा, सासू,सासरे आणि शंभरीकडे झुकलेली आजी सुद्धा तिला सोडायला आलेली,

आजी..इतकं वय झालं पण अजूनही कडक होती,

नातसुनेच्या बाळंतपणासाठी उत्सुक होती..

सर्वजण तिच्या माहेरी पोहचले,

सर्वांची जेवणं सुरू होती,

आजी नातसुनेकडे बघत होती,

माहेरी आल्यावर चेहऱ्यावर आलेलं हायसेपण आणि आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता,

आपल्या आई वडिलांजवळच कितीतरी वेळ ती घुटमळत होती,

हे सुख आजीला चांगलंच परिचित होतं,

आता परिस्थिती खूप चांगलीये, आजीच्या काळी सासर म्हणजे दुसरं नरकच..अपरिमित छळ आणि वेदना..

भाग 2

माहेर-2

भाग 3

माहेर-3

4 thoughts on “माहेर-1”

Leave a Comment