किंमत-3

 गजरा? कोणाला?

मला अन कोणाला? – ती अजून मोठ्याने ओरडली..

अच्छा, कशासाठी?

माझ्या मढ्यावर ठेवायला..

डोक्यावर हात मारून ती तणतणत तिथून निघून गेली,

बाहेर जाऊन एका ठिकाणी रडत बसली, एवढीशी गोष्ट सुद्धा करू शकत हा माणूस..बायको म्हणून काय सुख आहे मला..

स्वतःला कोसत असतांना तिचा मोबाईल वाजला..

मोबाईल कसला, डब्बाच तो..चिगटपट्टीने तोलून धरलेलं जुनं 1500 मधलं मॉडेल, पण कामासाठी बरा वापरात यायचा..

पलीकडून पोलीस बोलत होते,

“तुम्ही सरनाईकांकडे कामाला आहात ना? ताबडतोब इकडे या..”

ती घाबरत घाबरत तिकडे जायला निघाली,

जाताना मोठ्या मुलाला सांगून गेली, मी आलीच अर्ध्या तासात, मालकीण बाईंच्या घरी जातेय..

तिकडे गेल्यावर बंगल्यावर प्रचंड गर्दी ..पोलिसांचा घेरा..आजूबाजूची लोकं जमा झाली होती..

रिपोर्टर जमले होते,

काहीतरी अघटित घडलं होतं,

ती पोलिसांपाशी गेली,

“साहेब तुम्ही फोन केलेला..”

“हो..तुमच्या मालकीण बाईंचा खून झालाय…त्यांच्या नवऱ्यानेच केलाय..”

“काय? कसं शक्य आहे?”

तिला विश्वास बसत नव्हता,

“तिचा नवरा दारूच्या धुंदीत रोज रात्री बायकोला शिवीगाळ, मारहाण करायचा…

वर तो बाहेर अनेक बायकांशी सूत जुळवत होता..अशी तुमच्या मालकिणीच्या डायरीतून आम्हाला माहिती मिळाली..खून करून दारूच्या नशेत तो इकडेच पडला आणि आमच्या हाती लागला..काही गोष्टींची पूर्तता करायची आहे, तुम्हाला बोलवू तेव्हा पोलीस स्टेशनला या..”

“चालेल साहेब, तुम्हाला काही मदत लागली तर मला फोन करा..”

हे सगळं बघून मीनाच्या पायाखालची जमीन सरकली,

बायकोला फुला सारखा ठेवणारा, महागडी गिफ्ट देणारा हाच का तो नवरा?

आणि मनात असंख्य वादळं पेलवून राणी सारखं जीवन जगतेय असं भासवणाऱ्या याच का त्या मालकीण? 

विचार करता करता घर आलं..

बाहेर नवरा काळजीत बसला होता,

अगं कुठे होतीस? किती काळजी वाटलेली मला..

तिच्या नवऱ्याच्या डोळ्यातील शुद्ध प्रेम बघून तिला समजलं, राजाची खरी राणी कोण होती..

राणी बनून राहण्यापेक्षा..

निर्व्यसनी, एकनिष्ठ आणि प्रामाणिक नवरा मिळणं..

हे स्त्रीचं सर्वात मोठं सुख असतं…

त्याची किंमत आज तिला कळली,

आणि त्याच्या सायकलला लटकवलेल्या पिशवीतुन मोगऱ्याचा येणारा सुगंध सगळं काही सांगून गेला…

***

11 thoughts on “किंमत-3”

  1. आजकालच्या मुलींना वाचायला लावा ही कथा.. अजून कितीतरी श्रद्धा मरणाच्या दारात जात आहेत निर्बुद्धपणे मुलांना भुलून..

    Reply

Leave a Comment