पलीकडलं रूप-1

 “चार कप चहा आणा”

 

तिकडून आवाज आला तसं रचनाने पटकन चहा टाकला,

 

डोक्यावरचा पदर सांभाळला, 

 

चहा उकळायची वाट बघत होती,

 

डोक्यात विचार सुरू होते,

 

तिच्या दुकानातली सगळी कामं खोळंबली होती,

 

कारण चार दिवस चुलतनणंदेच्या लग्नासाठी ती लग्नघरी आलेली,

 

त्यांच्याकडे रितच होती,

 

सासरकडचे लग्न म्हणजे सुनांना लवकर बोलावून घ्यायचं,

 

सगळी कामं करवून घ्यायला,

 

अगदी कपडे धुण्यापासून ते स्वयंपाक,

 

त्या चार दिवस राब राब राबणार,

 

आणि जातांना कोणत्या कामात काय हलगर्जीपणा झाला याचे टोमणे ऐकून जाणार,

 

रचनाला सगळं माहीत होतं,

 

पण डोकं खराब करून घेण्याइतपत तिच्याकडे डोक्यात तेवढी जागाच नव्हती,

 

कारण तिचं डोकं दुसऱ्या गोष्टीत अडकलं होतं,

 

असो,

 

चहा उकळला आणि ती पटकन देऊन आली,

 

लागलीच स्वयंपाकाला लागली,

****

 

भाग 2

पलीकडलं रूप-2

भाग 3

 

पलीकडलं रूप-3

Leave a Comment