हनी ट्रॅप-3 अंतिम

 ब्लॅकमेल कुणाला करतोस, मी काहीही अश्लील बोललो नाही, पाहिलं नाही आणि लगेच त्या नंबरला ब्लॉक केलं,

मग त्याने मला स्क्रीनशॉट पाठवले, त्यात ती तश्या अवस्थेत असलेली मुलगी आणि खाली फोटोत मी दिसत होतो, तो म्हणाला की हा फोटो व्हायरल करतो..

मी घाबरलो, पण तरी त्याला पैसे द्यायला नकार दिला आणि पोलिसात जातो अशी धमकी दिली,

काही दिवसांनी एका मित्राने एका वेबसाईटवर तो फोटो पहिला आणि मला कळवलं, मित्र ओळखीतला होता म्हणून त्याने विश्वास ठेवला माझ्यावर..

पण पुन्हा हे पसरू नये म्हणून त्या माणसाला 1 लाख रुपये दिले,

एक लाख रुपये?

चिडू नकोस, मला वाटलं हे पैसे घेऊन तो शांत बसेल,

पण पुढच्या महिन्यात लगेच 5000 मागितले, मग हळूहळू नेहमी 2000, 10000 अशी रक्कम मागायला लागले, मला कठीण जाऊ लागलं..मी त्याला नकार दिला,

मग?

मग त्याने एका वेबसाईटवर तो फोटो टाकलेला, त्याचा स्क्रीनशॉट मला दिला..

मला असह्य झालं,

एकीकडे स्क्रीनशॉट पसरला तर माझी इज्जत जाणार, आणि पैसे देत राहिलो तर एक दिवस कंगाल होणार,

पोलिसांमध्ये जाण्याचा विचार का केला नाही?

ही लोकं खूप हुशार असतात, आपला थांगपत्ता लागू देत नाहीत, पोलीस चौकशी करत बसले असते आणि इकडे माझी इभ्रत चव्हाट्यावर आली असती..गेले काही दिवस त्याच टेन्शनमध्ये होतो मी, पण खरं सांगतो सुमित्रा, माझी काहीच चूक नव्हती गं.. मी कुणाच्याही जाळ्यात अडकलो नव्हतो,

मग ही गोष्ट मला का नाही सांगितली?

तुला पटली नसती, तू मलाच दोष देऊन निघून गेली असतीस, तू जाण्याच्या भीतीने तुला सांगत नव्हतो..

असं म्हणत तो लहान मुलासारखं रडू लागला,

तिने त्याला शांत केलं आणि म्हणाली,

“हे बघा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे..मी तुम्हाला दोषी ठरवलं असतं असं मनात तरी कसं आलं तुमच्या? तुमची यात काहीच चूक नाही मग घाबरायचं कशाला? मला आज थोडावेळ जरी उशीर झाला असता तर..”

असं म्हणत तीच डोकं धरून रडायला लागली,

दोघेही भावनाविवश झाले होते,

तिने डोळे पुसले, आणि म्हणाली..

जगाचं जाऊद्या, माझा तुमच्यावर विश्वास आहे..जगात चर्चा झालीच तर सगळं सोडून आपण दूर निघून जाऊ..पण मला नाही वाटत तसं काही होईल..आपण पोलिसात जाऊया..

अगं पण…

तिने काहीही ऐकलं नाही, दोघे पोलिसात गेले, सगळी हकीकत सांगितली..

पोलिसांनी सगळा डेटा घेऊन तपासाला सुरवात केली,

काही दिवसांनी ती मुलगी आणि फोन करणारा माणूस पकडला गेला,

त्यांनी अनेकांना असे फोन करून फसवलं होतं,

हे दोघेही तडक पोलिसात गेले,

ती मुलगी तोंड झाकून उभी होती,

सुमित्रा तिच्याजवळ गेली, म्हणाली.

फोनवर तर सगळी लाज टाकून उघडी व्हायचीस, आता तोंड दाखवायला काय लाज वाटते?

असं म्हणत तिने तिच्या डोक्यावरची ओढणी बाजूला केली आणि तिच्या कानाखाली जोरदार आवाज काढला,

त्यावेळी पोलिसांनीही अडवलं नाही,

त्या दोघांना शिक्षा झाली, आणि सुमित्रा आणि तिच्या नवऱ्याने नव्याने आयुष्य सुरू केलं..

***

मित्रहो, 

फसवणूक फक्त महिलांसोबत होते असं नाही,

चांगली माणसं सुद्धा या हनी ट्रॅप चा शिकार होतात,

आजच्या स्त्रीवादी युगात माणसांना पटकन “हापापलेला, निर्लज्ज, पापी” अशी उपाधी लागते, पण या सगळ्यात मनाने शुद्ध, निर्मळ लोकही अश्या जाळ्यात अडकून शिकार बनतात,

त्यामुळे आपल्या जवळच्या पुरुषांनाही याबाबत सावध करा..

कोणताही अनोळखी व्हिडीओ कॉल घेऊ नका,

कोणत्याही मुलीच्या बोलण्याला, चॅट ला बळी पडू नका,

नाहीतर पुढील हनी ट्रॅप चा शिकार तुम्ही असाल..

समाप्त

2 thoughts on “हनी ट्रॅप-3 अंतिम”

Leave a Comment