स्वावलंबी-1

“मला सपोर्ट मिळाला असता तर मीही पुढे गेले असते हो..”

महिन्याभरात दहाव्यांदा हा टोमणा तो ऐकत होता,

सगळं कसं सुरळीत चाललं होतं,

पण मधेच हिच्या डोक्यात हे कसलं भूत घुसलंय त्याला काही समजेना,

रोज रोज tv वरच्या सिरीयल बघून असेल,

किंवा कदाचित ईरा वरच्या नारीवादी कथा वाचून असेल,

की हार्मोन्सला भरती आलीये?

समजायला मार्ग नव्हता,

तो बिचारा साधभोळा,

बायकोवर कधी आवाज चढवला नाही,

ती जराशी चंचल, हौशी आणि बोलकी,

दोघेही हसत खेळत संसार करत होते,

पण गेल्या महिन्याभरात हे नवीनच खूळ तिच्या डोक्यात घुसलेलं,

त्याने शेवटी तिला एका ठिकाणी बसवलं,

आणि विचारलं,

“तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? काय सपोर्ट केला नाही मी?”

“मला म्हणत होतात तुम्ही की लग्नानंतर शिक म्हणून, पण लग्न झालं आणि..”

“आणि काय? तुला दिवस राहिले, तू खूप आनंदी होतीस..तू एकदा तरी विषय काढलास का शिक्षणाचा?”

“मी नाही काढला म्हणून तुम्हीही विचारू नये का?”

****

भाग 2

स्वावलंबी-2

Leave a Comment