“देवाजवळ दिवा तरी लावावा…गेली लगेच आराम करायला..”
हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत असलेली सुखदा रोजच घरी उशिरा येत होती. कोरोना मुळे तिच्यावर खूप जबाबदारी आली होती, या आजाराची टांगती तलवार रोज घेऊन ती कामावर जाई…आई वडील आणि मिस्टरांनि काळजीपोटी तिला सुट्टी घ्यायला सांगितली होती, पण सुखदा ला आपल्या कर्तव्याची पुरेपूर जाण होती, आपल्या पेशंट ची काळजी घ्यायला ती नेहमी तत्पर असे..
शहरात काही कोरोना बाधित रुग्ण सापडले आणि त्यांची भरती नेमकी सुखदा च्या हॉस्पिटलमध्ये केली गेली..आणि देखरेखीसाठी शुभदा ला तिथे जाणं भाग होतं… शुभदा स्वतः योग्य ती खबरदारी घेऊन त्या पेशंट ची पुरेपूर काळजी घेत होती…
कोरोना बाधित पेशंट अपराध्यासारखं अंग चोरून बसत.. सुखदा त्यानं या औषधं द्यायला गेली की स्वतःहून लांब होत..पण सुखदा कधीच त्यांना घाबरून त्यांच्यापासून दूर राहिली नाही, इतर वेळी पेशंट ची जशी काळजी घ्यायची तशीच ती या कोरोना पेशंट ची घेत असायची…
अश्या वेळी दिवसभर थकून आल्यावर तिच्या अंगात त्राण राहत नसे…
असंच एके दिवशी ती उशिरा घरी आली…सासूबाई वाटच पाहत होत्या…तिने आल्या आल्या अंघोळ केली, कपडे मशीन मध्ये टाकले आणि पटकन कशीबशी खिचडी टाकली…सासुबाईं बघत होत्या…
“देवाजवळ दिवा लाव..”
असं सांगायच्या आत ती खोलीत जाऊन पडली…तिला झोप लागली…घरात सर्वांनी जेवून घेतलं…मिस्टरही वेगळ्या खोलीत झोपत आता…
सासूबाईंना राग आला…देवाजवळ दिवा लावायला काय झालेलं? सगळं मीच करायचं का?
सासूबाई रागाच्या सुरात बडबड करत होत्या.. मिस्टर जेवून झोपले, त्याला तर माहितही नव्हतं की सुखदा न जेवताच झोपली ते…
सासूबाईंनी पोटभर जेवण केलं…
“आता झाकपाक कोण करणार? मी आहेच…तुम्ही बाहेर जा..मी आहेच फुकटची मोलकरीण..”
सासूबाईंनी सगळं आवरून tv लावला…
“मेलं आजार काय आला अन माझ्या सगळ्या सिरीयल बंद झाल्या…जिकडे तिकडे नुसतं हे कोरोना…”
सासूबाई बातम्या लावतात…आणि एकदम tv वर सुखदा दिसते…रिपोर्टर सांगत असतात..
“जिथे तुम्ही सर्वजण आपापला जीव सांभाळून घरी बसले आहात तिथेच या नर्स सारख्या रणरागिणी आपलं कर्तव्य निःसंकोचपणे पार पाडत आहेत…आपण बघू शकता या सुखदा मॅम, कोरोना पेशंट ची खास जबाबदारी सांभाळणाऱ्या या मॅम उत्कृष्टपणे आपलं काम पार पाडत आहेत…”
सासूबाई ते बघून एकदम हळव्या होतात…इतक्यात सुखदा चा फोन वाजतो…ती फोन हॉल मधेच विसरली असते…सासूबाई तो उचलून तिच्याकडे द्यायला जाणार तोच स्क्रीनवर त्यांचा हात लागून फोन उचलला जातो..त्या घाबरत कानाला लावतात..
“मॅडम…मी खास तुम्हाला फोन यासाठी केला की आज तुमच्यामुळे मी कोरोना वर मात करून बरा होऊन घरी परत आलो…जिथे माझ्या घरचेही माझ्याजवळ यायला कचरत होते तिथे तुम्ही आईसारखी माझी काळजी घेतली..तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही..”
हे ऐकून सासूबाईंच्या डोळ्यात पाणी येतं… “किती सहजपणे आपण सुखदा ला बोलून गेलो, पण ती बाहेर काय दिव्यातून जातेय हे आज मला कळलं..”
त्यांनी खिचडी गरम केली, ताटात वाढली..पापड भाजला…आणि वाढून त्या सुखदा च्या खोलीत गेल्या… आवाज ऐकून सुखदा उठली..
“झोप झोप..पडल्या पडल्या खाऊन घे…किती दमलीस गं तू…आत्ता तुझ्याबद्दल tv वर दाखवलं…मला समजलं पोरी तू किती मेहनत घेत आहेस ते..”
सुखदा ला ऐकून बरं वाटलं..खिचडी चा घास तोंडात टाकताच तिला आठवतं…
“अरेच्या…आज मी दिवा लावायचा विसरले..”
“काही हरकत नाही…मी तुला उगाच बोलले…आज मला समजलं…की तुझ्यामुळे कितीतरी लोकांच्या घरातला दिवा शाबूत आहे…”
©संजना इंगळे
(लेख नावासकट शेयर करा)
अश्याच सुंदर कथांसाठी माझ्या पेज ला फॉलो करू शकता
शुभदा की सुखदा ते एकदा नक्की करा…
खूप सुंदर कोरोना शी लढा देणाऱ्या डॉक्टर नर्स पोलीस सफाईकर्मचारी आणि इतर सर्वांचे खूप आभार
अगदी सुंदर डोळ्यात पाणी आले हो
अप्रतिम लेख मन भरून आलं
Nari tuzya krtutvala salam🙏🙏
अरे वाह!
❤❤❤
Khup sundar sasula kalal na tyatach anand ahe
Thank you all the medical system & policeman
Hat's of them
बोधक कठडे. फारच सुंदर
Very nice mam
Wark is warkship
Chaan
खुपच छान …
बघायलागेल तर एक नर्स,परीचारीका तर आहे पण खऱ्या दिव्यातुन त्यांनाच जाव लागत घर आणि हॉस्पीटलच काम मोठीजबाबदारी त्या लीलया पार पाडतात पेशंट्चचे ते बोलणे की मॅडम तुम्ही देव माणुस आहात त्या अगदी भरुन पावतात पण घरुन तीतका प्रती साद मीळत नाही हे र्दुदैवच म्हणाव लागेल
Very very very very very very very nice
Very very very very very very very nice
Salam ahe sukhadha sarakhe anek sisters na,🙏🙏🙏
wachun dolyat pani ale
Sunder katha
छान मन प्रसन्न झाले
खरोखरचं महिलांना घरून सपोर्ट पाहिजे आज सासूबाई ने टीव्ही वर न्यू ज पहिली नसती तर सुखदा उपाशी झोपली असती…..