साधी गोष्ट-1

सूनबाईच्या वागण्यातला बदल सासरेबुवांच्या चांगलाच लक्षात येत होता,

आधीसारखी ती वागत नव्हती,

तिला हाक दिली तरी लवकर उत्तर येत नसे,

आधी एका हाकेवर तयार असायची,

आता काहीतरी बिनसलं होतं,

लग्न करून या घरी आली, 20 वर्षे झाली तिला येऊन,

सगळं आयुष्य घर बघण्यातच गेलं,

मुलं मोठी झाली, शिक्षण घेत होती,

त्यांना सुनबाईचं हे वागणं खटकू लागलं,

कारण काय ते कळेना..

हे विचार मनात सुरू असतानाच त्यांची मुलगी, पुण्याहून घरी आलेली दिसली,

खूप दिवसांनी आली होती ती,

तिला बघून सूनबाईला आनंद झाला, नणंद नव्हतीच ती, मैत्रीणच होती,

सासुबाई धावत बाहेर आल्या, लेकीला बघून खुश झाल्या,

नणंद आत आली,

आई म्हणाली,

“बस दोन मिनिटं,

मी देवपूजा करत होते तशीच आले, उरकून येते पटकन”

सासुबाई देवपूजेला गेल्या,

*****

भाग 2

साधी गोष्ट-2

भाग 3

साधी गोष्ट-3

2 thoughts on “साधी गोष्ट-1”

Leave a Comment