सांता-2

 कुणाल दुपारी शाळेतून आला,

आईला विचारलं,

आई सांताक्लॉज म्हणजे गं?

“मले नाय माहीत..तुझ्या मास्तरीनला विचार..”

सकाळच्या धावपळीने वैतागलेली आई म्हणाली..

संध्याकाळी कुणालने बराच विचार केला,

“उशाशी पिशवी ठेऊन देतो, समजा सांताक्लोज आला तर यात वस्तू ठेवेल..मित्र म्हणत होते,

तो रात्री येतो..तो आला आणि त्याला पिशवीच मिळाली नाही तर?”

उशाशी ठेवलेली पिशवी नीट करत तो लवकर झोपी गेला..

त्याचे आई वडील मोलमजुरी करून घरी आले,

लेकरू आज लवकर झोपलं होतं..

आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला,

“लेकरू मोठं झालंय..” ती म्हणाली,

पण त्याचं बालमन सांताक्लॉजपाशी घिरट्या घालत होतं..

सकाळी त्याला जाग आली,

तो ताडकन उठला,

***

भाग 3

https://www.irablogging.in/2022/12/3_44.html?m=1

Leave a Comment