“आज पार्टीत प्लांट हेडला माझं नवं प्रपोजल दाखवतो, त्याला आवडलं तर आपली चांदीच चांदी…”
फाईल हातात घेत प्रमोद आपली बायको केतकीला सांगत होता,
ती सुद्धा पार्टीत जाण्यासाठी नवऱ्याला तयार करत होती..
शर्ट, सूट, पॅन्ट सगळं इस्त्री करून ठेवलं, शूज पोलिश करून ठेवले..
तो आवरेपर्यंत ती त्याच्या अवतीभोवतीच फिरत होती..
त्याचं आवरून झालं आणि तो घाईघाईत निघाला..
तो जाताच केतकी दार बंद करून आत आली,
तिचा फोन खाणाणला..
प्रमोदच्या ऑफिसमधल्या मित्राच्या बायकोचा फोन..
“निघाले का गं तुम्ही लोकं? आम्ही पोहोचूच.”
“पार्टी फक्त माणसांची आहे ना? फॅमिली पार्टी नाहीये”
मित्राची बायको मोठमोठ्याने हसायला लागली..
“कुणी सांगितलं? आम्ही सगळ्याजणी येतोय आपल्या नवऱ्यांसोबत”
केतकीने फोन ठेवला..
तिला रडू आलं..
प्रमोद खोटं बोलला होता..
दोन बाळंतपण, वेळोवेळी घेतलेल्या गोळ्या..
यामुळे तिचं वजन वाढलं होतं..
त्यात स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता..
शरीर बेढब झालेलं..
आरशापासून ती बाजूला झाली..
स्वतःकडे बघायला तिला नको नको झालेलं..
****
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?