शून्य-2

पराचा कावळा करायची,

शेवटी मुलगी ती मुलगी अन सून ती सून,

आईसुद्धा नाहक वहिनीचा द्वेष करू लागली,

मीनलला समाधान मिळायचं,

आई वडील अंथरुणाला खिळले तशी वहिनीने अपार सेवा केली,

मीनल मात्र संपत्तीत वाटा म्हणून प्रयत्न करू लागली,

फूस लावून अखेर अर्ध्याहून जास्त मालमत्ता तिने मिळवलीच,

आई वडील गेले,

तिने माहेरी फिरकून पाहिलं नाही,

भाऊ आणि वहिनी काटकसर करून संसार करत होते,

मीनलने मात्र सगळी हौस केली,

तिच्या नावावरची जमीन विकली,

मोठं घर घेतलं,

हळूहळू गाडी घेतली,

तिच्या नवऱ्याला तर सगळं आयतं मिळत होतं,

खुश होता तो,

पैशापुढे स्वाभिमान थिटा पडला,

उरलीसुरली सगळी मौज करत होती,

भाऊ अन वहिनी भेटायला आलेले तिला आवडत नसे,

लाज वाटायची तिला, कारण आता उच्चभ्रू सोसायटीत ती राहत होती,

एकदा त्या बायकांची पार्टी सुरू असतांना दादा वहिनी आले,

तिला वहिनीची ओळख करून द्यायला लाज वाटायची,

एकीने विचारलं,

ही कोण?

ही कुणी नाही..

कुणी नाही? झिरो आहे का?

हो झिरो आहे, झिरो म्हणजे कुणी नाही…हा हा हा…

बायकांमध्ये हशा पिकला,

वहिनीला रडू आलं…

ते परत गेले…

आपापल्या कामाला लागले,

भाऊ अन वहिनी आहे त्या जमिनीत शेती करत,

काबाडकष्ट करत,

दिवसभर राबत,

कितीतरी वेळा नुकसान होई,

पण कधी त्यावरून दोघांनी चिडचिड केली नाही,

कष्ट करत राहिले…

वहिनी हुशार होती,

नवनवीन प्रयोग करायची शेतीचे,

सेंद्रिय शेती, आवक, शेतमाल याची माहिती गोळा करे,

भावाला एकेक गोष्ट सांगून सगळं अंमलात आणे,

***

भाग 3 अंतिम

3 thoughts on “शून्य-2”

Leave a Comment