आई वडिलांच्या प्रेमाचा फायदा घेऊन तिने अर्ध्याहून जास्त संपत्ती तिच्या नावावर करून घेतली होती,
मीनल, स्वभावतःच जरा स्वार्थी,
काय करणार,
लहानपणापासून गरिबी बघितली होती,
लग्नही लवकर झालेलं,
नवऱ्यालाही जेमतेम पगार,
पण आयुष्य असंच जगत राहणं तिला पटत नव्हतं,
कुठून कसा पैसा येईल याचाच सतत विचार,
नकुल, तिचा भाऊ… साधभोळा बिचारा,
बहिणीच्या प्रेमापोटी संपत्तीचा 75% वाटा तिला देण्यात त्याने काहीही हरकत घेतली नव्हती,
मीनल माहेरी आली की तिचं रडगाणं गाई,
पैशांची किती चणचण आहे हे सतत सांगे,
एकाचं दोन करून सांगे,
आई वडील अन भाऊ ऐकून दुःखी होत,
प्रत्यक्षात तसं काही नसायचं,
ती खाऊन पिऊन सुखी होती,
भावाचं लग्न झालं,
वहिनी आली,
तीही बिचारी साधीबोळी,
ती आली आणि शेतीत चांगला नफा झाला,
तिचा पायगुणच म्हणा,
तिने सगळ्यांची मनं जिंकली,
मीनलला काय करू अन काय नको असं झालं,
वहिनीची ईर्षा वाटू लागली,
मग आईकडे तिचे खोटेनाटे गाऱ्हाणे करायची,
****
भाग 2
शून्य-2
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?