शाप-3

 आई ठाम होती, पिशवी इथेच ठेवलेली,

“घेतली असशील तर लवकर सांग…नाहीतर पोलिसांना बोलवेल..”

ती बाई घाबरली,

आवाज ऐकून आजूबाजूचे जमा झाले,

त्या बाईचा नवरा आणि सासूची तिला बोलू लागले,

“घेतली असशील तर दे लवकर..”

“मी नाही घेतली..खरं सांगते”

ती बाई जिवाच्या आकांताने सांगत होती,

“तुला साड्या घेत नाही म्हणून चोरी शिकली काय गं..” तिची सासू ओरडली..

“पटकन देऊन टाक त्यांचं..” नवरा ओरडला..

ती बाई नाही नाही म्हणत वैतागली..

आजूबाजुचे लोकही तिलाच बोलू लागले,

अखेर आईवडीलाही निराश होऊन निघाले,

“आपण त्या अगरबत्ती च्या दुकानात गेलेलो ना, तिकडे एकदा पाहून येऊ..”

तिघेही तिथे गेले,

दुकानातील बाई पिशवी साईडला करून यांचीच वाट बघत होती,

ते येताच त्यांच्या हातात पिशवी दिली,

“ही तुमची पिशवी, इथेच विसरलात..”

आई वडीलांचा जीव भांड्यात पडला, पण त्याहून जास्त वाईट वाटलं त्या बाईशी हुज्जत घालून,

त्या बाईकडे परत तोंड दाखवायची हिम्मत त्यांना झाली नाही,

हळूच केतकीला म्हणाले,

“आम्ही लांब उभे राहतो, तू जाऊन त्या बाईला सांग..पिशवी मिळाली म्हणून..”

केतकी तिथे गेली,

ती बाई अजूनही घाबरलेलीच होती,

सर्वांनी बोलून बोलून तिला जर्जर केलेलं,

तिचं लेकरू मात्र आईला सोबत म्हणून मांडीवर येऊन बसलेलं..

केतकी हळूच म्हणाली

“मावशी पिशवी मिळाली बरं का..”

ती बाई केतकी कडे एकटक बघत राहिली..

केतकी दिसेनाशी होईपर्यंत…

ती बाई निर्दोष होती, 

तिच्याशी हुज्जत घालून आई बाबांना काय मिळालं माहीत नाही,

पण त्या लेकराला मात्र आयुष्याचा एक धडा मिळाला..

की गरिबी हाच सर्वात मोठा शाप आहे…

समाप्त

1 thought on “शाप-3”

Leave a Comment