वर्तमान-1

आपला नवरा आपल्याला आपल्या पूर्व प्रियकराकडे घेऊन आला ही गोष्ट तिच्या पचनीच पडत नव्हती,

नवऱ्याचा हा नक्की राग आहे, प्रेम आहे की आणखी काही!

कळायला मार्ग नव्हता…

तिला वर्षभरापूर्वीचा दिवस आठवला,

एकांतात गप्पा मारायला पाठवलेल्या त्या दोघांची नजर बाहेर पडत असलेल्या पावसाकडे होती,

तो तिला पाहायला आला होता, बघताक्षणी त्याला ती आवडली होती,

तिला निसर्गात रमायला फार आवडायचं, आणि त्यालाही..

बऱ्याच गोष्टी जुळत होत्या,

तिला पाहिलं आणि त्याचा शोध संपला,

रीतसर बघायचा कार्यक्रम झाला,

आई वडिलांनी मुला मुलीला बोलायला खोलीत पाठवलं,

ती त्याला खोलीत घेऊन गेली,

तो बोलायला आतुर होता,

ती मात्र कुठेतरी हरवली होती,

त्याने तिला विश्वासात घेऊन विचारलं,

“मनात काही गोंधळ आहे का?”

“मला काही गोष्टी प्रामाणिकपणे सांगायच्या आहेत”

“बोल..” त्याने भीतभीत विचारले,

“माझा एक प्रियकर होता, 3 वर्ष नात्यात होतो आम्ही..”

“मग?”

“मग..भांडणं, एकमेकांबद्दल वाटत असलेला अविश्वास.. आणि अनेक कारणांनी नातं तुटलं..”

“आताही आहेस का संपर्कात?”

“नाही, पण त्याला विसरू शकले नाही मी”

“प्रयत्न केलास?”

क्रमशः

भाग 2

वर्तमान-2

3 thoughts on “वर्तमान-1”

Leave a Comment