लेहेंगा-1

एक अतिश्रीमंत जोडी…

नवतरुण..

नुकतंच लग्न ठरलेलं..

सोबत शॉपिंग करत होते,

तिला लेहेंगा घ्यायचा होता,

खूप गडबडीत होते दोघे..

रस्त्याच्या एका बाजूला कार लावली,

दोघांचेही फोन सुरू,

एकमेकांचा हात धरला आणि रस्ता क्रॉस करायला उभे राहिले..

एक पाऊल पुढे टाकलं तेवढ्यात…

तिच्या पाठीला पकडून आणि त्याच्या खांद्याला धरून झपकन कुणीतरी मागे ओढलं आणि समोरून भरधाव ट्रक गेली..

क्षणभर कळलंच नाही काय झालेलं..

दोघेही थरथरत होते,

फोनच्या नादात लक्ष नव्हतं..

त्यांनी मागे पाहिलं,

एका साधारण मुलीने त्यांना मागे खेचलं होतं..

“ताई दादा जरा सांभाळून की”

दोघांनी हात जोडून तिला धन्यवाद म्हटलं..

ती नसती तर क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं..

त्या दोघांना वाटलं तिला काहीतरी द्यावं,

पण मुलीने पर्स मध्ये हात टाकताच ती मुलगी हसून निघून गेली..

ते दोघेही पाहतच राहिले..

नंतर हळूच लक्ष देऊन रस्ता क्रॉस केला अन दुकानात शिरले..

छातीत अजून धडधडत होतं..

****

भाग 2
भाग 3

Leave a Comment