“आज एक तरी मासा गळाला लागला पाहिजे भाई..”
रस्त्याच्या कॉर्नरवर उभे असलेले टवाळ पोरं येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत होते,
आज valentines day, या टवाळ मुलांशी कोण मुलगी सलगी करेल? त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर कमेंट् करून, त्यांना इशारे करूनच यांना समाधान वाटे,
त्यांचा तो रोजचा दिनक्रमच होऊन गेलेला,
त्यात त्यांच्या मेन बॉस, रॉकी…
तोच या सगळ्याला उत्तेजन देई,
रॉकी, बारावी सायन्सला असणारा मध्यमवर्गीय घरातला मुलगा,
हट्टी स्वभाव, दिलखुलास जगणं आणि त्यात आजूबाजूला असलेल्या वस्तीतली मित्र, यामुळे तो असा बनला होता,
त्याची भारदस्त शरीरयष्टी आणि हिरो सारखं दिसणं कुणाही मुलीला भुलवेल असं होतं,
मुली या मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे निघून जात पण एकदा तरी लपूनछपून रॉकीला बघत, इतका सुंदर होता तो..
मित्र त्याला म्हणाले,
“रॉकी भाई, अरे आमचा हिरो तू आणि तुला एकही गर्लफ्रेंड नाही?
इज्जत घालवली तू आमची”
रॉकी केस नीट करत म्हणाला,
“अरे हाताच्या बोटावर मोजता येणार नाही इतक्या मुली पटवेन”
“भाई, आज एक तरी मुलगी पटवून दाखव, मग मानेल तुला”
“घेतलं चॅलेंज..”
असं म्हणत आता रस्त्यावरून जी मुलगी येईल तिला डायरेक्ट प्रपोज करायचं असं चॅलेंज त्याने घेतलं..
बराच वेळ वाट बघून झाल्यावर एक मुलगी येताना दिसली,
निळा पंजाबी ड्रेस, दोन्ही बाजूला पिन केलेली ओढणी, केसांची वेणी आणि हातातील पर्स सांभाळत ती येत होती,
भाग 2
https://www.irablogging.in/2023/02/2_14.html?m=1
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.