लक्ष्मी-1

लवकरच ते लग्न करणार होते,

दोघेही खुप आनंदात होते..

पाच वर्षांपासून एकत्र होते,

सर्वांचा विरोध पत्करून अखेर घरून परवानगी मिळवली,

आता त्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार होतं,

दोघेही खरेदीसाठी फिरत होते, कारमध्ये..

एका लांबच्या शहरात त्याच्या मित्राने खास बोलावले होते खरेदीसाठी,

त्याच्याकडे अप्रतिम साड्या होत्या,

तिला खूप आवडल्या,

खरेदी झाली आणि दोघेही तिथून निघाले,

दोघांच्या गप्पा चाललेल्या,

“हा माझा मित्र, शाळेपासून..

अभ्यासात खूप कच्चा होता, पण आज बघ किती मोठा व्यापार करतोय..”

“आपणही असं काहीतरी सुरू करू की..”

“माझ्या मनातलं बोललीस, मला फार इच्छा आहे एक मोठा बिझनेसमन व्हायची..”

“आणि माझीही..”

ती म्हणाली तसा तो हसला,

तिला हसण्याचं कारण समजलं नाही,

तिने दुर्लक्ष केलं,

तो म्हणाला,

“कार्तिक शिरोडकरला ओळ्खतेस?”

“त्याला कोण नाही ओळखत, टेकनोएज चा को फाऊंडर आहे तो..खूप कमी वेळात मोठा बिझनेस उभा केला, तेही इतक्या कमी वयात..”

“बरोबर..माझा मामेभाऊ आहे तो..”

“काय? सख्खा???”

“हो…”

“कधी बोलला नाहीस?”

“मामा आणि आमचे संबंध काही खास नाहीत, एखाद्या कार्यक्रमात होते भेट कधीतरी..”

“ओह..भारी हा पण..आपल्या लग्नाला बोलवूया त्यांना..”

“नक्की..”

बोलता बोलता दोघेही रस्ता चुकले,

एक तर लांबचे शहर,

त्यात आडवळणाचा रस्ता,

मोबाईलला रेंज पण नव्हती,

विचारत विचारत दोघेही जात होते,

जाता जाता एक भयाण रस्ता लागला,

त्याने गाडीची गती वाढवली,

गुंड आणि दरोडेखोर यांचा तो एरिया होता,

ते मागे लागले,

जवळपास पाच सहा गुंड होते,

त्यांनी गाडी अडवली,

दोघेही घाबरले,

भाग 2

लक्ष्मी-2

Leave a Comment