राणे मास्तर-3

 आई वडिलांना समजावत,

एकदा तर गणेश साठी त्याच्या नशेत असलेल्या वडिलांचा मारही खाल्लेला, पण आपला हट्ट त्यांनी सोडला नाही..

आज मास्तर दिसताच गणेशने त्यांचे पाय धरले,

“मास्तर, माझ्यासाठी तुम्ही इतकं काही केलं होतं ते मी कसं विसरेन? मला शाळेत जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले नसते तर आज मी इतका मोठा झालोच नसतो, मी विदेशात असतो..खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे. भारतात आल्यावर खूपदा तुम्हाला शोधायचा प्रयत्न केला पण तुम्ही सापडला नाहीत…तुमच्या नावाने परदेशात मी इन्स्टिट्यूट सुरू केलं आहे…तुमचे आयुष्यभर उपकार असतील माझ्यावर”

राणे मास्तरांना गलबलून आलं..

Tv वर वाचलेलं नाव खरोखर त्यांचं होतं,

गणेशला मास्तरांची सगळी हकीकत कळली, तो म्हणाला..

“मास्तर, तुम्ही इतकी आयुष्य घडवली, इतक्या लोकांना शिक्षण दिलं… तुमची जागा इथे नाही…माझ्यासोबत परदेशात चला..तिथे तुमच्या सारख्या शिक्षकाची खूप गरज आहे आमच्या सारख्या तरुणांना मार्गदर्शन करायची…”

मास्तरांचे डोळे चमकले,

आयुष्यभर एक स्वप्न पाहिलं होतं,

ते अश्या पद्धतीने पूर्ण होईल कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं,

महिन्याभरात मास्तरांची सगळी सोय केली गेली,

बॅग उचलत मास्तर गाडीत जायला बसले,

आजूबाजूचे सर्व लोकं, जे मास्तरांना वेडसर समजत होते,

ते डोळे विस्फारत मास्तरांकडे बघत होते,

माणूस वेडसर वाटत असला, तरी या माणसाने आयुष्य कशासाठी झिजवलं होतं ते त्यांना कधीच कळणार नाही,

पण ज्याला ते कळायचं त्याला कळलं,

मास्तरांची शिकवण वाया गेली नाही,

कुणीतरी त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवली होती,

आणि आज अनपेक्षितपणे मास्तरांचं स्वप्न पूर्ण झालं होतं..

समाप्त

33 thoughts on “राणे मास्तर-3”

  1. I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

    Reply

Leave a Comment