राणे मास्तर-1

 राणे मास्तर फाटकी पिशवी घेऊन रस्त्याच्या कडेने जात होते,

बाजूला असलेल्या झोपडपट्टीत डोकावत, लहान मुलं दिसले की ओरडत,

“शाळेला जायचं नाही का? दप्तर उचल आणि जा”

“आलं परत..”

झोपडपट्टीतले लोक त्यांना वेडसर समजत,

रोज रोज येऊन हेच बोलून जात,

साधारण 65 ते 70 च्या दरम्यान वय असावं,

संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांना शिकवण्यात गेलं,

तेही शहरात नाही, 

आदिवासी पाड्यात, 

आयुष्यभर बायकोचे टोमणे ऐकले,

तिला सुखसोयी हव्या होत्या,

आणि मास्तरांना ज्ञानदानाचं काम करायचं होतं,

 नशिबाने त्यांच्या पदरात मूल टाकलं नाही,

बायकोला दोष न देता ते म्हणत,

“अगं देवाचीच इच्छा आहे की माझ्या हातून या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, म्हणून संसाराचा व्याप तो आपल्यावर टाकत नाहीये”

*****

भाग 2

https://www.irablogging.in/2023/02/2_12.html

भाग 3

https://www.irablogging.in/2023/02/3_12.html

2 thoughts on “राणे मास्तर-1”

Leave a Comment