राजकुमारीची गोष्ट-1

“शर्वरी हा मेसेज कुणाचा आहे सांग पटकन, हा dear❤️ नावाने कुणाचा नंबर सेव्ह केलाय?”

सतरा वर्षाच्या शर्वरीच्या मेसेजची रिंगटोन वाजली, नोटिफिकेशन आलं आणि आईने ते पाहिलं..

“शर्वरीने पटकन फोन उचलला”

“आई तू कशाला हात लावलास माझ्या मोबाईल ला?”

“मी हात नाही लावला, दिसलं मला…पण कोण आहे हा?”

“बेस्ट फ्रेंड आहे माझी..”

शर्वरी तुटक तुटक उत्तर देऊन तिच्या खोलीत पळाली,

आईच्या जीवाला घोर लागला..

शर्वरी कॉलेजला जायला लागली खरी, पण सध्या तिचं वागणं वेगळंच दिसत होतं..

मोबाईल मध्ये बघून हसणं, प्रेमगीतं लावून तंद्रीत जाणं..

आईला काळजी वाटू लागली..

आईने माहिती काढली,

शर्वरीची जवळचीच एक मैत्रीण, किशोरी..

सध्या तिचं शर्वरी कडे येणं बंद झालेलं..आईने तिला संपर्क केला…तिने जे सांगितलं तर ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली..

“मावशी, तिची मैत्रीण म्हणून मी तिला वाईट मार्गाला लागण्यापासून खूप विरोध केला, पण तिने उलट माझ्याशीच मैत्री तोडली…”

“कॉलेजच्या शेजारीच एक कँटीन आहे, तिथे एक मुलगा कामाला आहे. कर्तृत्व काही नाही पण फक्त दिसायला खूप छान आहे, हिरो सारखं वागणं, बोलणं, बाईक फिरवणं… खूप मुलींना तो आवडतो, पण त्याचं सध्या शर्वरी सोबत बसणं उठणं वाढलंय…तिला वाटतं त्याचं तिच्यावर प्रेम आहे पण त्या मुलाने आधीही खूप मुली फिरवल्या आहेत…आणि शर्वरीसोबत कंटाळा आला की पुन्हा नवीन बघेल तो…मी हे शर्वरीला समजावलं, पण ती म्हणतेय की आमचं खरं प्रेम आहे…तिने तर माझ्याशी बोलणं सोडलंय… तिची मैत्रीण म्हणून तुमच्या कानावर घालतेय…पण मावशी प्लिज मी तुम्हाला सांगितलं असं कळू देऊ नका”

***

भाग 2

राजकुमारीची गोष्ट-2

भाग 3 अंतिम

राजकुमारीची गोष्ट -3 अंतिम

1 thought on “राजकुमारीची गोष्ट-1”

Leave a Comment