फोनवरून मुलाच्या आवाजातला फरक आईने हेरला होता,
काहीतरी बिनसलं आहे दोघांचं, आईला समजत होतं,
तिने शेवटी न राहवून विचारलंच,
“नक्की काय बिनसलं आहे तुम्हा दोघांचं?”
आईच्या अश्या स्पष्टपणे विचारलेल्या प्रश्नाने तोही क्षणभर गोंधळला,
वर्ष झालं होतं लग्नाला,
त्याने त्याच्याच पसंतीची एक मुलगी बघितली,
घरच्यांनाही कसलेही आढेवेढे न घेता लग्न लावून दिलं,
दोघेही लग्न करून दूरवर त्यांच्या नोकरीच्या शहरात आले,
छानसा फ्लॅट, गाडी..सगळं काही झालं होतं,
लग्नानंतर 15 दिवसांनी तो पुन्हा कामावर रुजू झाला,
तिने नुकतीच नोकरी बदलली होती, त्यामुळे नवीन ठिकाणी जॉईन व्हायला अजून अवकाश होता,
संसार सुरू झाला,
नव्याचे नऊ दिवस संपले,
ती म्हणाली, मला कामाची सवय नाही..
इन मिन दोन लोकांकरिता त्यांनी कामवाली लावली,
ती भांडी, झाडू, फरशी, कपडे सगळं करुन जाई,
यांना फक्त खाण्या पिण्याचं पाहायचं होतं,
तिने नवीन नवीन उत्साहाने केलं सगळं,
पण नंतर कंटाळली लगेच,
सकाळी नाष्टा म्हणून मॅगी, जेवायला भात, आणि रात्री सकाळचं उरलेलं खायचं,
रोजच असं करू लागली,
तिच्या याच गोष्टीचा त्याला राग येऊ लागलेला,
आईला त्याने अखेर सांगितलं,
****
भाग 2
https://irablogging.in/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-2/
भाग 3
https://irablogging.in/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80-3/