मैत्री, प्रेम आणि बरंच काही-2

काय म्हणावं यांना,

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना..

या सगळ्यात मुख्य गोष्ट कधीच कबूल केली नाही, की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून,

त्यामुळे प्रत्यक्षात मनातलं असं बोलणं झालंच नाही,

कमिटमेंट झालीच नाही,

सगळं गृहीत होतं..

तो तसा लाजाळू, पटकन काही बोलत नसे,

फक्त ही असली की सगळं बाहेर काढे

तिलाही माहीत होतं हे,

त्यामुळे चारचौघांत त्याला ती सांभाळून घेई..

कॉलेज झालं,

तिने करियरचा वेगळा मार्ग निवडला,

आणि त्याने पुढचं शिक्षण करण्याचा निर्णय घेतला, परदेशात…

तरीही दोघे संपर्कात होते,

घरच्यांनी तर गृहीतच धरलं होतं की दोघे लग्न करणार म्हणून,

पण त्याने अचानक अमेरिकेत असताना मुलीचा फोटो दाखवला आणि हिच्या पायाखालची जमीनच सरकली..

त्याने घरी सांगितलं नव्हतं,

त्याच्या घरी जायचा एकदा प्रसंग आला,

त्याच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं,

ती म्हणाली,

“अहो भावी वहिनी, लग्नाचं सगळं तुलाच पाहायचं आहे बरं…”

तिने हसून प्रतिसाद दिला,

तिने विचार केला,

घरात आनंदाचं वातावरण आहे, यांना नको काही कळायला..

आशुतोषला तिने सांगितलं,

लग्न होईपर्यंत तुझ्या गर्लफ्रेंड बद्दल काही बोलू नकोस,

लग्नाला तो दोन दिवस आधी येणार होता,

इकडे ही त्याच्या घरी मुक्कामाला गेली,त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीसाठी..

सगळं बघत होती, बहिणीच्या खरेदीपासून ते केटरिंग च्या मेनू पर्यंत,

त्याची आई मधेच म्हणायची,

एक लेक चालली पण दुसरी येणार, अशी सून मिळायला नशीब लागतं, बघा…अगदी बारीकसारीक सगळं बघतेय ती आत्तापासूनच, मी मुलीची आई असून माझ्यावर काही लोड नाही…

****

2 thoughts on “मैत्री, प्रेम आणि बरंच काही-2”

Leave a Comment