मैत्री, प्रेम आणि बरंच काही-3

आई आनंदित व्हायची पण तिला माहीत होतं, हा सगळा गैरसमज कधीतरी दूर होणार, अन सर्वांना त्रास होणार,

डोळ्यातलं पाणी ती लपवायची,

घरातलं सगळं बघायची, पण मनोमन प्रयत्न करायची की कशात जीव अडकू नये,

तरी तिचा जीव अडकायचाच,

चहा ठेवतांना ओळखीचं झालेलं किचन,

दाराबाहेरची तुळस,

सर्व वस्तूंच्या जागा,

घराच्या भिंती,

ज्यांना तिने आपलं मानलं होतं,

उद्या ते दुसरीचं होणार,

अडकलेला जीव काढायचा होता तिला,

पण तो निघत नव्हता..

लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला,

आशुतोष त्या दिवशी येणार होता,

सगळे खुश होते, त्याच्या स्वागतासाठी तयार होते,

ती पण खुश होती, त्याला बघण्यासाठी आतुर होती,

पण पाय मागे सरत होते,

त्याला पाहिल्यावर तिचा मनावर ताबा राहणार नाही आणि ती सर्वांसमोर रडेल, सगळेजण नाना प्रश्न विचारू लागतील..

या भीतीने तिने तिथून जायचं ठरवलं,

“काय गं वहिनी? अगं दादा येतोय, कुठे चाललीस?”

“अगं माझी खरेदी बाकिये थोडी, मी करून आले..”

“दादापेक्षा खरेदी महत्वाची आहे का गं?”

“तसं नाही गं, त्याला आहे अजून वेळ, तोवर येऊन जाईन की..”

“नक्की ना?”

“हो नक्की..”

ती निघाली, बाजारात गेली,

घ्यायचं तर काही नव्हतं, नुसत्या चकरा मारत होती,

डोक्यात वेगळंच वादळ सुरू होतं..

त्याच्या घरी न जाता सरळ आपल्या घरी जायचं तिने ठरवलं,

जाता जाता रस्त्यावर एक होर्डिंग तिला दिसलं,

त्याच्याकडे बघून तिला काहीतरी आठवू लागलं,

काहीतरी होतं त्यात, आधी पाहिलेलं, पण समजत नव्हतं..

घरापर्यंत गेल्यावर तिच्या डोक्यात अचानक प्रकाश पडला,

“आशुड्या हरामखोरा…नालायक कुत्र्या..”

असं म्हणत तिने गाडी वळवली अन सरळ आशुतोषच्या घराकडे काढली,

घरी जाताच आशुतोषने दार उघडले,

****

भाग 4
https://irablogging.in/%e0%a4%ae%e0%a5%88%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9a-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b9/

2 thoughts on “मैत्री, प्रेम आणि बरंच काही-3”

Leave a Comment