मिस परफेक्ट (भाग 8)

तुषार अन आई दोघेही आत जाऊन मामांशी बोलतात, पण मामा काही प्रतिसाद देत नाहीत. मग माधवी ची पाळी येते..
माधवी आत जाते, काहीही न बोलता मोबाईलवर काहीतरी करते आणि मामांसमोर धरते…

“बघा…मॅट्रिमोनि साईटवर सुरेखा चं खातं उघडलंय…इतके सारे मुलं तयार आहेत लग्नाला…सगळं तयार आहे…पण तुम्ही असे बेडवर पडलात त्यामुळे अडून राहिलंय… बघा आता मुलीचं लग्न कुठल्या वयात करायचं ते…आणि हो, सुशांत ला education loan मिळण्याची व्यवस्था केलीये…पण तुमची सही नसल्याने राहिलं ते बाजूला…जाउद्योज तुम्हाला काय…पडून रहा मस्त…”

एवढं बोलून माधवी बाहेर येते…अन डॉक्टरांची एकच धावपळ उडते..

“डॉक्टर, पेशंट रिस्पॉन्स देतोय…”

“ECG चेक करा..रिपोर्ट काढा पटकन…”

मामा उठून बसतात…

“कुठेय मुलं… पेन आना… सही करतो…”

डॉक्टर पेचात पडतात….हे काय भलतंच?

तुषार अन आई आनंदित होतात…

“माधवी काय केलंस असं की मामा उठून बसले…”

“काही नाही…एवढंच समजावून दिलं की आयुष्य खूप सोपं आहे, तुम्ही त्याला अवघड बनवून ठेवलं..”

तुषार ला समजलं, माधवी ने नक्की काहीतरी युक्ती वापरली असणार…तो तिला तिथेच मिठी मारतो….

सगळेजण घरी येतात..

घरी येताच दारावर एक लेटर लावलेलं असतं, सासबाईंच्या नावाचं…

सासूबाई ते उघडून वाचतात…अन डोक्याला हात लावतात…

“झालं…एक झालं की दुसरं संकट समोर यायलाच हवं…”

“आता काय झालं?”

“निवडणूका आल्या आहेत…ते काम लावलं आता आम्हाला…शिक्षक आहोत की सरकारी नोकर तेच कळत नाही..”

“मग नका जाऊ की..”

“अगं तिथे जाण्याबद्दल काही वाटत नाही, पण मी नसताना घर कोण बघेल?? मागच्या वेळी अशीच दिवसभर गेलेले अन आल्यावर घराचा पार कचरा डेपो करून टाकलेला या बाप लेकानी…”

“अहो पण यावेळेस मी आहे ना..”

“म्हणून तर टेंशन वाढलंय..”

“बस का सासूबाईं…हीच का आपली….”

“बाई…तू नोकरीवर जाशील की घर बघशील? उलट तुझी ओढाताण होईल…”

“तसं असेल तर मग मी सुट्ट्या टाकते…”

“नको नको..आत्ताच जॉईन झाली आहेस तू…लगेच सुट्ट्या घेणं बरोबर नाही….”

“सासूबाई तुम्ही उगाच टेन्शन घेताय…मैं हु ना…”

“बरं… तू म्हणतेस तर जाईन मी माझ्या कामाला..”

दुसऱ्या दिवशी सकाळचे 7 वाजलेले असतात…सासूबाई तयार होऊन तुषार अन मिस्टरांना…

“येते हो मी , लांबच्या गावात पोस्टिंग आहे..बस ने जायला वेळ लागतो, मी लगेच निघते…आम्हाला तिकडूनच जेवण असतं… तुम्ही करून घ्या काहीतरी… आणि सर्वात महत्वाचं, माधवी कडे लक्ष असू द्या…तुमचं काम राहुद्या बाजूला…तिला किचन मध्ये जाऊ देऊ नका…”

तुषार अन बाबांची झाली ना पंचाईत…खाणार काय दोघे?

तुषार अंघोळीला गेला…किचन मध्ये कुकरची शिट्टी ऐकू आली अन फेसळलेला तुषार तसाच बाहेर आला…

“अगं ए…बंद कर…बंद कर तो गॅस…अन हो बाहेर चल..”

“तू निघ, आधी अंग धु मग ये बाहेर..”

“जातो मी, पण तू हॉल मध्ये बस माझं होईपर्यंत…”

“हा चल…”

माधवी त्याला आत पाठवते…तुषार तयार होतो अन ऑफिस ला जायला निघतो..

“चल गं येतो मी…कॅन्टीन मध्ये खाईन आज..”

“कशाला? मी डबा बनवलाय..”

“तू?”

“हो..एक शब्द बोलायचा नाही…उचलायचा अन निघायचं…”

तुषार डब्याची नीट चाचपनी करून निघून जातो…

रिटायर सासरेबुवा घरीच असतात…किचन मध्ये मॅगी चं पाकीट घेऊन पाऊल टाकतात तोच…

“पप्पा काय हे? मॅगी?”

“हा..म्हटलं आता काही भेटत नाही खायला..”

“कसं भेटत नाही? हे घ्या, नाश्त्या ला पोहे..सोबत ज्यूस…ही भाजी, पोळी अन वरणभात… दुपारच्या जेवणासाठी…. खा अन एन्जॉय करा…bye…”

सासरेबुवा घाबरतात…एक तर हिने किचन मध्ये पाऊल ठेवलं…त्यात आणखी हे इतके सारे पदार्थ… हिला समजलं तर आपली वाट लागेल…

माधवी सर्वांच्या खाण्याची व्यवस्था करून अन घरातलं सर्व आवरून ऑफिस ला जाते…

संध्याकाळी तिच्या आधी सासूबाईं घरी आलेल्या असतात…घर पाहून अवाक…. माधवी येण्याची वाट बघतात..

ती येते तशा सासूबाई आरतीचं ताट घेऊन येतात..

“काय हे आई..”

“अगं तुझं कौतुक किती करू…एवढं सगळं आवरून तू गेलीस…”

“सोपं आहे हो…उगाच तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवत होतात…”

“ते जाऊदे पण आपली कामवाली, इतके भांडे घासायला नाही म्हणत होती…आज कसेकाय घासले तिने? “

“आजही ती नाटकं करत होती, मग मी काय केलं…माझ्या मोबाईल वर गाणे लावून तिला हेडफोन लावून दिले काम करताना…ती घासतच गेली घासतच गेली…किती घासले तिलाच कळलं नाही…”

“चांगली आयडिया केलीस…”

“बरं आई, मी शेजारच्या शिंदे काकूंकडे जाऊन येते…मला बोलवताय त्या कधीच्या भेटायला…”

“हो हो ये जाऊन..”

माधवी शिंदे काकूंकडे जाते…त्यांची सून काम करत असते…चांगली शिकलेली आणि मॉडर्न होती त्यांची सून…पण जरा दबावाखाली दिसली..

“ये माधवी…नवीन सून आलीये म्हटलं शेजारी…ओळख करून घेऊ म्हटलं…”

“बोला…काय नाव आपलं? माझं नाव माधवी..”

“माझं ? मी रेखा शिंदे…ही माझी सून अनघा..”

“काय करते ती..”

“घरकाम..”

“शिकलेली दिसतेय..”

“हो..काय करायचंय शिकून, शेवटी घरच तर सांभाळायचं असतं..”

“बरं… चल अनघा आपण फिरून येऊ…मस्त जीन्स घाल, मीही घालते…”

“आता कुठे? किती कामं पडलीये घरात…”

“मग कामं आवरून घ्या…मी येते थोड्या वेळात..”

“उगाच बोलावलं गं तुला…माझ्या सुनेला जीन्स घालायला लावतेस…मला नाही आवडत बाई जीन्स घातलेली..”

“तुमचा बेडरूम कुठेय?”

तिकडे..

माधवी त्यांच्या बेडरूममध्ये जाते आणि सरळ त्यांचं कपाट उघडते…

“हे काय करतेय?”

“तुमच्या जीन्स शोधतेय..”

“माझ्या?”

“हो..तुम्हीच म्हणाला ना, तुम्हाला जीन्स घातलेली आवडत नाही म्हणून…एक काम करा, तुम्ही घालत जाऊच नका आवडत नाही तर…आम्ही त्याला फिटिंग करून वापरत जाऊ…आम्हाला आवडतात..”

“काय?”

“हो..साधं गणित आहे…तुम्हाला आवडत नाही, तुम्ही घालू नका…आम्हाला आवडतात, आम्ही घालू…”

क्रमशः

bindhast girl, daughter in law india, funny lady, must read marathi story,
Marathi story

437 thoughts on “मिस परफेक्ट (भाग 8)”

Leave a Comment