नीरज ला रात्रभर झोप लागत नाही, काय प्रकरण आहे हे नक्की?
या चौघांच्या भेटीनंतर नीरजच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळतं. नीरज आता या चौघांचं रहस्य शोधायला लागतो. नीरज ऑफिसमध्ये जाताच बॉस सोबत हे सगळं बोलतो…
“नीरज, आपलं काम फक्त मुलाखत घेणं आहे…बाकीच्या उद्योगात तुम्ही पडू नका..”
“सर पण याचा संबंध दहशतवादी संघटनेशी असू शकतो..आपण पोलिसांना कळवलं पाहिजे..”
“वेड बीड लागलंय का? कोणाविरुद्ध तक्रार देशील? बिझनेसवूमन सारिका? शूटर चॅम्पियन राशीद? की आमदार आशा चव्हाण ची? डोक्यातून हे खूळ काढून टाक…आणि आता नवीन काम देतोय तुला..काल तू ती बातमी आणून खूप चांगलं काम केलंस..आता कुठेही खून, दरोडा, ड्रग्स चे छापे पडले की बातमी आणायचं काम तुझं..”
नीरज चं जवळ जवळ प्रमोशन केलं होतं, पण नीरज च्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते.. आणि पोटापाण्यासाठी त्याला नोकरीही सोडता येणार नव्हती…त्याने नाईलाजाने होकार दिला…
परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी नकली पासपोर्ट आणि कागदपत्र सापडले होते, देश विदेशात बेकायदेशीर प्रवास करणाऱ्यांना हे गुन्हेगार मदत करत होते…नीरज ला ताबडतोब स्पॉट वर जायला सांगितलं गेलं..
नीरज ने आपली बॅग भरली आणि तो बस मध्ये जाऊन बसला…बस सुरू झाली आणि नीरज चं विचारचक्र सुरू झालं…
“सारिका मिराजदार… बिझनेसवूमन..भरपूर पैसा…आशा चव्हाण, वरपर्यंत ओळख..संपदा, एक विचित्र बाई…रशीद…शूटर…. जन्म, परभणी…. एक sec… राईट…परभणी. राशीद चं जन्मगाव…. चला..आपली दोन्ही कामं होतील आता…”
नीरज परभणी जिल्ह्यात पाय ठेवतो.. गावाच्या वेशिवरच एक वेडा माणूस त्याच्याजवळ येतो आणि विचित्र हावभाव करू लागतो…नीरज मागे होतो…कसातरी त्याच्यापासून सुटका करून घेत तो इच्छित स्थळी जातो.
एका पडक्या घरात अस्ताव्यस्त असं समान पडलेलं होतं,
पण लॅपटॉप, प्रिंटर, वाय फाय असं अत्याधुनिक सर्व यंत्रणा तिथे होती. कुणाला शंका येऊ नये म्हणून गुन्हेगारांनि हे ठिकाण निवडलं होतं.
तिथली सगळी बातमी घेऊन तो बॉस ला रिपोर्टिंग करतो…
“ठिके नीरज, तुम्ही संध्याकाळीच परत या… दुसरी एक बातमी आणायची आहे तुम्हाला मुंबईतून..”
“सर मी आज इथेच थांबायचं म्हणतोय…”
“का? महाप्रसाद वाढलाय का तिथे??”
“नाही सर…ते..बस नाहीये आता पुढची..”
नीरज ने काहीतरी कारण बॉस ला पटवून तिथेच थांबायचा निर्णय घेतला…पण आता राहायचं कुठे?
नीरज असाच विचार करत करत फिरत होता..तो एका गावात पोचला, आजूबाजूला शेती आणि मध्ये काही घरं होती…शेतात एक गडी काम करत होता..नीरज त्याच्याजवळ जाताच तो थबकला…
“राशीद???”
राशीद नीरज ला पाहून चमकला…
“इकडे कसकाय??”
“गावातली बातमी जमा करायला..”
राशीद त्याला घरी घेऊन जातो…नीरज अजूनही धक्यातच असतो…तो राशीद चं घर बघतो…घरात त्याची अम्मा, भाईजान असतात..भिंतीवर लष्करातील वेषातला आणि माळ घातलेला एका माणसाचा फोटो असतो…
“वडील आहे माझे…म्हणजे…होते..”
राशीद पाण्याचा ग्लास त्याच्या हातात टेकवत सांगतो..
“तुम्ही इकडेच राहता?”
“हो..स्पर्धा असेल तेव्हा फक्त शहरात येतो..बाकी इथे शेती आहे आमची..”
नीरज च्या मनात गोंधळ चालू होता, त्याला वाटायचं की राशीद आणि बाकी तिघे एखाद्या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असावे, पण राशीद चे वडील जर सैन्यात असतील तर राशीद ने असं करणं शक्यच नाही…
राशीद त्याला शेतातल्या एका भागात शूटिंग चा सेटअप असलेल्या ठिकाणी नेतो..
“इथे मी सराव करतो..”
नीरज सर्व निरीक्षण करतो..
“तुम्हाला परत जायचं असेल तर निघायला हवं, 7 ची बस आहे..”
नीरज त्याला कसं सांगणार की त्याला इथे थांबायचं आहे. नाईलाजाने त्याला निघावं लागलं, तसंही राहायची काही सोय होणार नव्हती…
नीरज ला राशीद ने निरोप दिला, एका रिक्षात त्याला बसवलं आणि रिक्षा वाल्याला बस स्टॉप पर्यंत न्यायला सांगितलं. रिक्षा बस स्टॅण्ड जवळ उतरताच तो वेडा माणूस तिथे आला, रिक्षावाला ओरडला…
“ए चल हट… काय कटकट आहे नेहमीची…”
“आहे कोण हा?”
“आहे एक वेडा…वेडा म्हणजे खरं तर वेडा नाही म्हणता येणार…”
“म्हणजे?”
“हा या गावचाच एक गृहस्थ… शिक्षक होता..मुलाच्या परिक्षे साठी पुण्याला सर्वजण गेलेले, तिथे जर्मन बेकरितल्या बॉम्बस्फोटात याने त्याचं कुटुंब गमावलं… फार हुशार माणूस होता हो…गावकऱ्यांनी त्याला खूप सांभाळायचा प्रयत्न केला, पण तो कुणालाही जुमानत नव्हता, अखेर गावकरी कंटाळले, आणि हा आता फिरतोय असा रस्त्यावर….”
“अरेरे….”
पैसे घेऊन रिक्षावाला निघून गेला ..नीरज ला त्या माणसाबद्दल वाईट वाटलं…तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला शंभर रुपये देऊ केले..
ते पाहताच तो वेडा हसायला लागला…फाटक्या पॅन्ट च्या खिशातून त्याने 2000 रुपयांचे 2 बंडल काढून दाखवले…आणि नीरज च्या हातात त्यातली 2 हजार ची नोट दिली…हे करताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भाव होते…गूढ भाव, त्याने नीरज कडे असं पाहिलं की त्याची नजर डोळ्यांना आरपार भेदून गेली होती..
नीरज घाबरला ..मागे झाला…
“काय माणूस आहे…जाऊद्या, आपल्याला काय…”
नीरज त्याची बस पकडतो..बस सुरू होताच तो सीट वर मागे डोकं टेकतो..त्याला थकवा आलेला असतो..पण मनात त्या चौघांचे विचार अजूनही चालू असतात..
“राशीद…. शेती…शूटर…आशा चव्हाण… आमदार…सारिका मिराजदार… पैसा….परभणी….गुरुजी….”
“गुरुजी..गुरुजी…”
“काय????? गुरुजी???? शिक्षक??? परभणी???”
नीरज एकदम जागा होतो..आपल्या हातातून किती मोठी गोष्ट निसटली या विचाराने तो डोकं आपटून घेतो…
क्रमशः
छान
अतिशय उत्तम लेखन
अकल्पनीय