मिशन इंडिया (भाग 4)

 

 

 

नीरज ने इतक्या मुलाखती घेतल्या पण ही 3 माणसं त्याच्या डोक्यात सतत घुमत होती, एकाहून एक गजब व्यक्तिमत्त्व होती ती…काहीतरी connection होतं त्या तिघांमध्ये…तिघांची क्षेत्र वेगळी होती, तिघांच्या वाटा वेगळ्या होत्या..पण एक कुठलीतरी कडी होती जी या तिघांना बांधून होती.

“मिस्टर नीरज…मुलाखतींचे आर्टिकल्स झालेत का लिहून.”

“हो सर..हे घ्या…”

“बरं… नशीब, हे तरी काम पूर्ण केलंत…नाहीतर तुमची नोकरी नक्कीच घालवली असती मी…”

असं म्हणत नीरज चा बॉस तिथून निघून जातो…नीरज त्याच्या आर्टिकल्स च्या कॉपी स्वतःजवळ ठेऊन घेतो…आजचं काम उरकून तो घरी जायला निघतो..आज पहिल्यांदा नीरज ला काम संपवण्याचा आणि कुठलंही ओझं न पेलता घरी जायचा अनुभव आला होता.

“आज काहीतरी गोडधोड घेऊन जावं…किती दिवस झाले शांततेत जेवलोही नाही..”

नीरज आज भलताच समाधानी दिसत होता…त्याने जाता जाता एका हॉटेलवर गाडी थांबवली आणि पार्सल घेऊन तो तिथून निघाला…

हॉटेल च्या दारातून बाहेर पडताना त्याला रस्त्यावर एक गर्दी दिसली…हॉटेल जवळच्या एका शॉप वर पोलिसांनी धाड टाकली होती… तिथे बंदुका आणि काही बॉम्ब असं समान जमा करण्यात आलं…नीरजला तर आज लॉटरीच लागली…तिथे अजून कुणीही रिपोर्टर आलेला नव्हता..नीरज ने हीच संधी साधली आणि तो तडक तिकडे गेला..त्याने माहिती घेतली आणि लागलीच बॉस ला फोन केला…बॉस खुश झाला, कारण ही बातमी सगळ्यात आधी त्यांना मिळाली होती…नीरज ने पटापट फोटो काढले आणि बॉस ला पाठवले…

तिथली गर्दी सरू लागताच नीरजही तिथून जायला निघाला…त्याचं लक्ष गर्दीच्या बाजूला असलेल्या काही लोकांकडे गेलं…2 स्त्रिया बुरख्यात होत्या…एक व्यक्ती डोक्यावर पूर्ण हूड घेऊन होता, आणि उरलेल्या 1 स्त्री साडीत डोक्यावर पूर्ण पदर घेऊन होती…

नीरज ला आश्चर्य वाटलं, वेगवेगळ्या धर्माची लोकं अशी एकत्र ? तेही या ठिकाणी? त्याने वरवर त्यांना पाहिलं…पोटात भुकेचा डोंब उसळला असल्याने नीरज आधी घरी गेला…

घरी जाऊन मनसोक्त जेवला, आणि दमलेला असल्याने त्याला पटकन झोप लागली…तो गाढ झोपेत असताना त्याला एक स्वप्न पडलं… स्वप्नात ती चार माणसं दिसू लागली…हूड घातलेल्या व्यक्तीचा हात दिसत होता, आणि साडीतल्या स्त्री च्या गळ्यातली माळ त्याला आठवू लागली….

नीरज झोपेतून ताडकन उठून बसला…

“म्हणजे तो माणूस? राशीद?…आणि साडीतली ती …आशा चव्हाण??”, बुरख्यात सारिका??…मग ती चौथी व्यक्ती कोण होती??”

नीरज ला पक्की खात्री झाली…की या तिघांचं काहीतरी कनेक्शन आहे..कुठल्या तरी मिशन वर आहेत ही….

नीरज डोळे चोळतो आणि आपली बॅग घेतो..त्यातून मुलाखतीच्या कॉपीज बाहेर काढतो…पानं चाळून या तिघांच्या मुलाखती तो वर काढतो आणि नीट निरीक्षण करतो..

या तिघांच्या मुलाखतीत “गुरुजी” हा शब्द सारखा होता…काहीजण गुरुजींच्या फोन साठी मुलाखत सोडून गेलेले….कोण आहे हा “गुरुजी?”, काय करवून घेतोय तो या तिघांकडून??? ही तिघे नक्की कोण आहेत? यांचा ISI शी तर काही संबंध नाही ना??

तो खिडकीतून बाहेर बघतो, शेजारचं घर त्याला स्पष्ट दिसत असतं… तिथल्या संपदा नामक “संस्कारी” सुनेचा त्याला चांगलाच दणका बसला होता…तो खिडकी लावून घेणार इतक्यात त्याला खिडकीतून दोरी खाली टाकत संपदा खाली उतरताना दिसते…

नीरज ला धक्का बसतो…आता हे काय वेगळं प्रकरण?? नीरज ला राहवत नाही, तो तिच्या मागे जातो…

एका लांबच्या बिल्डिंग मध्ये एका फ्लॅट मध्ये ती जाते…हा तिच्या मागोमाग जातो…संपदा फ्लॅट मध्ये जाऊन दार बंद करते…आता मात्र नीरज कडे घरी परत जाण्याशिवाय पर्याय नसतो…पार्किंग मधून जात असताना त्याला गाडी दिसते..

“सारिका मॅम ची गाडी??? आणि….हे काय, शूटर बॅग?? म्हणजे…त्या चौघातली चौथी व्यक्ती म्हणजे…संपदा??”

क्रमशः

 

1 thought on “मिशन इंडिया (भाग 4)”

Leave a Comment