मित्र मैत्रीण-3

 त्याने आपल्या बायकोकडे पाहिलं,

समोरची मुलगी निघाली तर? बायकोशी अप्रामाणिक तर नाही ना होणार? मनात चलबिचल झाली..

मी कुठे बायकोचा हात सोडतोय, फक्त एक मित्र म्हणून। भेटतोय,

समोरचा मुलगा आहे की मुलगी हेही माहीत नाही,

मग घाबरायचं कशाला?

तो स्वतःलाच समजावत होता,

सुट्टीच्या दिवशी तो तयारी करून निघाला,

ठरल्या ठिकाणी पोहोचला,

तिथे ती व्यक्ती येणार होती,

दोघांनीही ड्रेस कोड पिवळा ठरवला होता,

जेणेकरून ओळखता येईल..

तो वाट बघत होता,

मनात बिनकामाच्या गुदगुल्या होत होत्या,

ही भावना चुकीची आहे हे स्वतःला समजावत होता तरी ताबा नव्हता,

अखेर एक पिवळ्या पोशाखात एक व्यक्ती पाठमोरी त्याला दिसली,

पण जेव्हा ती वळली, तेव्हा याचीच बोबडी वळली,

कारण त्याला त्याची बायको तिथे दिसली,

दोघांनी एकमेकांना पाहिलं,

क्षणभर घाबरले,

पण विचारात पडले..

“हाच का तो??”

ती त्याच्याजवळ गेली,

कसं विचारावं?

दोघेही एकदम म्हणाले,

“ऑनलाइन पोर्टल???”

घ्या,

अनामिक म्हणून नवरा बायकोच एकमेकांशी बोलत होते,

दोघांनाही हसू आवरत नव्हतं,

नंतर दोघेही मुद्द्यावर आले,

“तुला आयुष्यात इतकं एकटं वाटत होतं तर माझ्याशी प्रत्यक्ष का नाही बोललास?”

“तुझा आनंदी चेहरा बघून तुला दुःखं द्यायला मला पटत नसायचं..पण एक मिनिट, तू तर नेहमी आनंदी दिसायची..मग तुला कसली सल होती? ततुही म्हणायचीस, की आयुष्यात सगळं आहे पण सुख नाही..”

दोघेही आज प्रत्यक्ष मोकळे होत होते,

“लग्नाला 4 वर्ष झाली, प्रयत्न करूनही मूल होत नाही, तुला घाई नव्हती म्हणून तुला ताप देत नव्हते, पण आपण आई होऊ की नाही या भावनेने मन पोखरून निघत होतं माझं..”

“मला कधी सांगितलं नाहीस हे, माझा जवळचा मित्र यात स्पेशालिस्ट आहे, तात्काळ उपचार करेल तो…इतकं काय त्यात..”

ती आनंदून गेली,

“आणि तुला का रे एकटं वाटायचं?”

“आयटी कंपनीतला लोड माहितीये ना तुला, त्यात ऑफिस चं राजकारण.. घराचे हफ्ते सुरू, त्यामुळे सोडताही येत नाही..KF सारख्या मोठ्या कंपनीत जॉब करायचं स्वप्न होतं माझं, ते काही पूर्ण होणं शक्य दिसत नाही..”

“धत तेरे की, एवढंच? अरे KF मध्ये माझी बेस्ट फ्रेंड मुख्य HR आहे…तुझं काम कसं होत नाही तेच बघते..”

त्याचे डोळे चमकले..तो खुश झाला…

बघा,

ज्या गोष्टीसाठी दोघेही डोकं आपटत होते तीच गोष्ट एकमेकांनी चुटकीसरशी सोडवली,

पोर्टल वर गाजावाजा करण्यापेक्षा एकमेकांशीच बोलले असते तर? 

काखेत कळसा अन गावाला वळसा..

दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं,

डोळ्यातलं पाणी दोघांनी लपवलं,

आता दोघे एकमेकांचे offline पोर्टल बनले आणि सुखी राहू लागले…

****

नवरा बायकोचं नातं घट्ट करायचं असेल,

तर आधी एकमेकांशी मैत्री करा…

बघा संसार कसा फुलत जाईल ते…

बायकोशिवाय चांगली मैत्रीण नसते,

आणि नवऱ्याशिवाय उत्तम मित्र नसतो,

कारण त्या नात्यात निरपेक्षता असते…

समाप्त

476 thoughts on “मित्र मैत्रीण-3”

Leave a Comment