मित्र मैत्रीण-1

म्हणायला दोघेही नवरा बायको,

पण दोघांचं तोंड दोन दिशेला,

तो आयटी कंपनीत कामाला,

आणि ती कॉलेजमध्ये प्रोफेसर..

ती मजेत असायची,

घर, नोकरी सगळं सांभाळून आनंदी राहायची,

पण तो मात्र आतून पोखरत जात होता,

ऑफिसमधलं राजकारण, दुसरं काही नाही,

मोकळं व्हायला विश्वासू असे मित्रही नव्हते,

बायकोला सांगून काही उपयोग नाही असं त्याला वाटायचं,

म्हणून तो तिच्याशी जुजबी बोलायचा,

संसाराच्या गोष्टी फक्त,

“अमुक एक पॉलिसी काढली आहे, तमुक एक इन्व्हेस्टमेंट करूयात…किराणा घेऊन येतो, भाजीपाला तू आण..”

एवढाच काय तो संवाद,

जणू संसार नावाच्या प्रोजेक्टवर दोघेही काम करत होते,

त्यात भावना दिसत नव्हत्या,

गरज आणि गरजेप्रमाणे संसार,

तो रोज ऑफिसमधून यायचा,

****

भाग 2

मित्र मैत्रिण-2

2 thoughts on “मित्र मैत्रीण-1”

Leave a Comment