मस्ती की पाठशाला – (भाग 7)

 

दुसऱ्या दिवशी वर्गात…

“तो आशिष पाटील तुझा शेजारी आहे ना?”

“हो..”

” आपण काय करणार यार … “

“काहीतरी करावं लागेल.. “

“का करतोय आपण हे ?”

“खरंच .. आपण का करतोय हे मॅम साठी ? आजवर आपण कधी दुसऱ्याचा इतका विचार केला नव्हता … “

“मॅम ने खरंच जादू केलीये यार आपल्यावर .. आजवर कुठल्याही शिक्षकाने आपल्याला इतकं समजून घेतलं नव्हतं.. आपला इतका मनापासून विचार करील नव्हता .. पण मॅम ने इतक्या कळकळीने आपल्यसाठी किती काही केलं …. “

“आता आपली पाळी … “

विद्या चा वर्गात तास होता . शिकवून झाल्यावर मानस ने विद्या ला विचारलं ..

“मॅम … एक प्रश्न आहे .. अभ्यासाबाहेरचा आहे … “

“विचार …”

“आपल्यावर एखादी गोष्ट लादली जात असेल .. आणि आपल्याला ती नकोशी असेल तर काय करावं ?”

“जो आपल्यावर ती गोष्ट लादत असेल त्याला जाणीव करून द्यायची .. कि तो चुकीचं करतोय …”


प्रश्नाचं उत्तर देऊन विद्या निघून जाते …

इकडे मुलं चर्चा करतात …

“मॅम ने आपल्याला हिंट दिलीय .. मॅम च्या वडिलांना पटवावं लागेल कि तो आशिष योग्य मुलगा नाहीये … “

“ए तो कुणाच्या शेजारी राहतो रे?”

“माझ्या … ” अनघा उत्तर देते …

नकुल च्या डोक्यात एक प्लॅन शिजतो .. तो सर्वांना बोलावून एक प्लॅन सांगतो … आणि सर्वजण कामाला लागतात …

दुसऱ्या दिवशी रविवार असतो .. सुट्टीचा दिवस .. सर्वजण कॉलेज च्या आवाराबाहेर जमतात …

“आकाश आला का रे?”

“आलाय …त्या गाडीत बसलाय … बाहेर येतच नाहीये.. जाम लाजतोय ..”

“अरे आपल्या प्लॅन मधेच आहे ना तसं … “

नकुल आकाश ला ओढत जाऊन आणतो … त्याला पाहून कुणालाही हसू आवरेना ..

“काय रे .. मीच सापडलो होतो का तुम्हाला मुलगी बनवायला … “

“अरे तू दिसायला सुंदर .. आय मिन हँडसम आहेस …म्हणून …”

“ए पण कुणाला शंका नको यायला कि तू मुलगा आहेस … एक काम कर.. इथून तिथपर्यंत चालून दाखव बर ..मुलीच्या चालीत चालायचं बर का …. “

आकाश तसं चालण्याचा प्रयत्न करतो .. थोडं पुढे जाताच …

“आशिक बनाया …आपने ….. ” काही टुकार मुलं आकाश वर लाईन मारत निघून गेले…

“ए हराम****.. ” आकाश दगड उचलत त्या गाडीच्या दिशेने फेकतो …

इकडे मुलं हसून हसून लोटपोट होतात …

“चला. ..आकाश वर कुणी आता शन्का घेणार नाही …”

“अनघा ला फोन करा…”

“हॅलो अनघा…आशिष निघाला का घरातून?”

“हो…आत्ताच निघाला…तुम्ही तयार रहा….”

“ए आशिष निघालाय…हॅलो शंतनू….तू रेडी आहेस ना?”

“हो ..”

आशिष घरातून गाडीवर बाहेर पडतो…मुख्य रस्त्यावर येताच आकाश, म्हणजेच so called ती सुंदर मुलगी समोर येते..आशिष गाडी थांबवतो… आकाश लिफ्ट मागतो आणि त्याच्या मागे बसतो…

इकडे शंतनू विद्या मॅम च्या घराबाहेर जाऊन मॅम च्या वडिलांच्या गाडीची हवा काढतो..वडील घाईघाईत बाहेर जायला निघतात अन पाहतात, गाडीची हवा गेलीये…ते वैतागतात… इतक्यात शंतनू बाईक घेऊन…

“अरे काका तुम्ही? सोडून देऊ का?”

“कोण तू? अहो मी विद्या मॅम चा विद्यार्थी… सोडतो ना तुम्हाला…”

“बरं चल..”

शंतनू वडिलांना घेऊन निघतो… कानात हॅडफोन असतात आणि त्याने आकाश सोबत संपर्क चाललेला असतो…

“हॅलो..आकाश… अरे कुठेय??”

आकाश आशिष च्या मागे असल्याने त्याला काही बोलता येईना ..कारण आवाज काढला तर समजेल की मी मुलगा आहे ते…


आकाश ला काय करावं सुचेना.…..मग आकाश मुलीचा आवाज काढून त्याला ठिकाण सांगतो…

शंतनू विद्या चा वडिलांना घेऊन त्याच रस्त्यावर येतो…गाडी मुद्दाम आकाश आणि आशिष च्या गाडीजवळ नेतो….विद्या च्या वडिलांचं लक्ष जातं..

जसं त्यांचं लक्ष जातं तसा आकाश आशिष शी लगट करतो…एक मुलगी आपल्याला चिटकून बसतेय म्हणून आशिष सुद्धा खुशीत होता…असही टुकारच होता ना तो…

विद्या च्या वडिलांना धक्काच बसतो…

“ए गाडी पुढे घे पुढे घे…त्या मुलाच्या गाडीशेजारी..”

वडील निरखून पाहतात…तो आशिषच असतो…

“अन अश्या मुलाला मी माझी मुलगी देणार होतो…देवा वाचवलंस रे बाबा…”

शंतनू खुश होतो..

“काका काय म्हणालात?”

“काही नाही…तुझ्या कामाचं नाही…”

शंतनू हसत स्वतःशीच म्हणतो..

“आम्ही काम केलं म्हणुन डोळे उघडले ना साहेब…”

पुढे शंतनू आणि आकाश वेगवेगळ्या दिशेने जातात…आशिष गाडी थांबवतो…

“चल…हॉटेल मध्ये जाऊ…जेवायला..”

आकाश मुलाच्याच आवाजात..

“ए निघ रे…”

आशिष चमकतो…

आकाश जीभ चावतो..आपण मुलाचा आवाज काढला…

आशिष चिडतो…”कोण आहेस तू?”

आकाश विचार करतो…अन टाळ्या वाजवायला सुरवात करतो….

“ए पैसे दे ना रे बाबा….ए दे ना…ए दे ना..”

“ए हट… हट… निघ”

आशिष आकाश ला हटकतो आणि त्याला सोडून तिथून निघून जातो…

क्रमशः

 

2 thoughts on “मस्ती की पाठशाला – (भाग 7)”

Leave a Comment