मस्ती की पाठशाला – भाग 3

  

बडबड करणारी मुलं अचानक शांत होतात, विद्या बोर्ड वर काय काढतेय नक्की? सर्वांच्या नजरा बोर्ड वर खिळल्या… कमेंट पास करणारी मुलं सुद्धा शांत राहून पाहायला लागली.


विद्या ने mathematics असं नाव टाकलं…chapter name trigonometry..आणि खाली काही सूत्र लिहिते…

ते नाव पाहूनच मुलांनी नाकं मुरडली..
विद्या मुलांकडे एकदा बघते…”काय वाचलं तुम्ही?”

“ट्रीगोनोमेट्री..”

“सर्वात बोरिंग chapter…नाही का??”

आपल्याच मनातलं मॅडम बोलल्या पाहून मुलं बोलती झाली…

“हो ना मॅडम…दहावीला फार कठीण गेलं हो हे…”

“मी तर ऑप्शनलाच सोडला होता..”

“काय सांगताय? अरे मला सुद्धा अजिबात आवडायचा नाही हा विषय…पण मग मला हे जेव्हा समजलं की ट्रीगोनोमेट्री कुठे वापरली जाते, तेव्हा अचानक मला त्याच्यात आवड निर्माण झाली..”

“मॅडम..आम्हालाही खरोखर प्रश्न पडतो, हे सगळं कुठे वापरलं जातं? काय उपयोग आहे हे फॉर्मुले पाठ करून?”

“सांगते…आपण trigonometry, derivatives शिकणार तर आहोच..पण त्या आधी हे सगळं कुठे वापरलं जातं हे शिकणार आहोत”

सुस्तावलेली मुलं अचानक उत्साही झाली…मॅडम ने पहिल्याच तासाला मुलांचं मन जिंकलं होतं…

“तर..नकुल इकडे ये…त्या खुर्चीवर उभा रहा…”

“मॅडम मी काही केलं नाही…मी तर शांतपणे ऐकतोय…”

“अरे राजा शिक्षा म्हणून नाही…गेम खेळायचा आहे एक..”

गेम चं नाव ऐकून नकुल चटकन खुर्चीवर उभा राहिला….बाकीची मुलं लक्ष देऊन बघत होती…आज काहीतरी हटके करायला मिळणार म्हणून मुलं आनंदात होती…त्यामुळे डबा खाऊन झाल्यानंतर आलेली सुस्ती सुद्धा कुठच्या कुठे पळाली..

“तर…तुम्हाला नकुल ची उंची मोजायची आहे..”

“एवढंच ना..आना रे टेप..”

“अहं… टेप, पट्टी न वापरता…मी तुम्हाला फक्त 2 गोष्टी सांगेन…त्याच्या आधारावर उंची ओळखायची..”

मुलं विचारात पडली..

“मोजपट्टी न वापरता कशी काढणार उंची? इंटरेस्टिंग…”

मुलं डोकं लावू लागले…पट्टी किंवा टेप शिवाय उंची मोजलेली कधी पाहिली नाहीये…

“ऋचा..इकडे ये…समोर उभी रहा नकुल च्या…तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगते…ऋचा नकुल कडे त्याच्या पायाच्या समांतर राहून 45 अंशाच्या कोनाने नकुल कडे बघतेय…आणि नकुल पासून ती 3 मीटर अंतरावर उभी आहे…आता सांगा नकुल ची उंची?”

“Angle माहितीये…distance माहितीये…पण त्यावरून उंची कशी काढणार??”

“करा विचार..”


इतक्यात ऋचा चं लक्ष बोर्ड कडे जातं…

“ए…समजलं मला…मॅडम पेन द्या..”

“घे.”

“अरे हा काय समोर फॉर्म्युला आहे…tan(θ) = opposite side/ adjacent side.

Opposite side म्हणजे नकुल ची उंची, adjacent side म्हणजे माझं त्याच्यापासून अंतर…म्हणजे..

“ए height चा फॉर्म्युला तयार कर..height म्हणजे

tan(θ)*adjacent side

मुलं पटापट वही काढतात…”tan 45 किती असतो रे..”

“Tan 45 म्हणजे 1”

एक हुशार विद्यार्थी उत्तर देतो..

“म्हणजे 1 गुणिले 3 मीटर…3 मीटर… नकुल ची उंची 3 मीटर आहे…”

सर्व मुलं उत्तर काढतात…ऋचा साठी सर्वजण टाळ्या वाजवतात… टाळ्यांचा आवाज बाहेर staff रूम पर्यन्त ऐकू जातो…काही शिक्षक हळूच ढूकुन बघतात..

त्या दिवशी staff रूम मध्ये विद्या चीच चर्चा असते…
पहिल्याच दिवशी हिने वर्ग गाजवला म्हणून काहीजण कौतुक करत होते तर काहीजण ईर्ष्या…

दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपल ची परवानगी घेऊन विद्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पार्किंग मध्ये जाते…एक नवीन फॉर्म्युला शिकवायचा असतो…

मुलांना आता विद्या चा तास आवडू लागलेला..तिच्या तासाला एकही जण बंक मारायचा नाही…

दुसऱ्या दिवशी पार्किंग मध्ये..

सर्वांनी आपापल्या गाड्या काढा…ग्राउंड वर चला…एक गेम खेळायचा आहे…

मुलं आतुरतेने वाट बघत होती नव्या गेमची…

क्रमशः

16 thoughts on “मस्ती की पाठशाला – भाग 3”

  1. where buy clomiphene no prescription get clomiphene online how to get generic clomid without prescription clomiphene pills can you get cheap clomiphene without a prescription where to buy cheap clomid cost generic clomiphene without insurance

    Reply

Leave a Comment