मवाली सून (भाग 5)

बेनीलाल काही बाहेर येत नाही,त्याच्या गोदामात तो लपलेला असतो..

“अपुन को मालूम है तू इधरिच है…बाहेर ये लवकर..”

लक्ष्मी आणि तिचे साथीदार सुरा बाहेर काढतात… लक्ष्मी सासूबाईंना इशारा करते…हत्यार बाहेर काढा म्हणून..

“बोला था ना बचाव साठी काहीतरी सोबत घ्या म्हणून…काढा काय आणलंय ते..”

सासूबाई भीत भीत लाटणं बाहेर काढतात..

“धत तेरे की…लाया तो क्या लाया… ये लाटणा…”

सर्वजण हसायला लागतात..

“ए शुउउऊ… बेनीलाल ला शोधा…”

सर्वजण पूढे होतात…सासूबाई घाबरून गपचूप मागे एका कोपऱ्यात उभ्या राहतात…

सर्वजण पाठमोरे उभे असतात…बेनीलाल हळूच मागून येतो अन लक्ष्मी च्या डोक्यात दांडा मारणार इतक्यात…

इतक्यात सासूबाई मागून जोरात त्याच्या डोक्यात लाटणं टाकतात…

सर्वजण मागे वळतात…

“Ohho… पहिले ही दिन सिक्सर…शिकल्या शिकल्या..”

सासूबाईंचा हात लटपटत असतो…पूर्ण अंग घामाने भिजलं होतं..

“ए ए लक्ष्मी..हा हा मेला तर नाही ना…मी..मी जेल मध्ये नाही जाणार ..”

“ए SB …कायको डरती है…अपुन है ना…कुछ नाही हुआ उसको…ए पक्या, उठा ले इसको और अपने अड्डे पे ले चल..”

“अगं सुनबाई..का त्याच्या मागे लागलीये? काय केलंय त्याने?”

“काय केलंय? त्याचा कंपनीतल्या कामगारांकडून काम करून घेतलं आणि पगार देत नाहीये साला…”

“अगं मग ते पोलिसांचं काम..”

“पुलीस लोग का काम हलका करने के लिये अपुन का जनम हुआ है….”

बेनीलाल ला सगळे घेऊन जातात…काही वेळाने तो शुद्धीवर येतो…

त्याला समोर 2 बायका आणि 3 माणसं अंधुक अंधुक दिसतात..डोळे तो चोळून बघतो…त्याला सर्वजण स्पष्ट दिसू लागतात…

“क्या बे…तेरे लोगो की आमदनी क्यू नही देता बे??”

“माफ करा..पण माझ्याकडे खरंच पैसे नाहीये…काळजी न घेतल्याने सगळा माल सडला…कुठून देऊ पैसे?”

“वो तेरी जिम्मेदरी बे..एक मिनिट..तेरे तो बहोत सारे बंगले और गाडी है ना? एक भी बिक दिया तो पैसा आजायेगा…”

“पक्या..याचा एक बंगला विकण्याची व्यवस्था कर…पैसे घे आणि कामगारांना वाटून दे…”

सासूबाईंनी भीती जरा कमी झाली, त्यांना समजलं..लक्ष्मी गुंडागर्दी करते पण चांगल्या साठी….

आजची सुपारी आटोपून सासू सून घरी येतात. सासूबाई दमलेल्या असतात…स्वयंपाक बाकी असतो..

“SB..आज तुने अपुन को टीप दि…अपुन भी तेरको एक टीप देगा..”

“काय..”

“आजका खाना मैं पकायेगा..”

सासूबाईंना हायसं वाटतं….जेवणं होतात…स्वयंपाक खूपच छान झालेला असतो..

सासरेबुवा विचारतात..

“काय मग…कोणाकोणाला धुतलं आज…”

सासूबाईंना हसू आलं…काय काय झालं ते मोठ्या गमतीने त्या सांगू लागल्या..

“तुझाही जम बसतोय म्हणजे…ते सोड, सुनबाई च्या डोक्यावर जरी परिणाम झालेला असला तरी स्वयंपाक विसरली नाही हा ती..”

“हो…छान स्वयंपाक केलाय हो तिने..”

लक्ष्मी फोनवर बोलत बाहेर येते…

“किधर? अभी???”

“SB… चलो, एक सुपारी आहे.”

“अगं घरात पान सुपारी द्यायचं सोडून या सुपाऱ्या कसल्या घेतेय?” निखिल बोलला..

“देख….बिच मे मत आ..”

तिचं बोलणं खूप गंभीर होतं, त्यावरूनच काहीतरी भयंकर घडलं आहे याची जाणीव झाली..

लक्ष्मी तिघ्या पोरांना आणि सासूबाईंना घेऊन निघते…

“सुनबाई काय झालंय नक्की?”

“दुसाने चा फोन आलेला…त्याच्या घरा शेजारून एका लहान मुलाचा रडायचा आवाज येत होता खूप, त्याचा शेजारी त्याला मारतोय..”

सगळेजण तिकडे पोचतात…दुसाने त्यांना सांगतो, “ते घर..”

हे सगळे दार वाजवतात..

“कोण आहे?”

“‘तेरी मौत..”

शेजारी घाबरतो, दार उघडत नाही…

हे तिघे दार तोडतात..

आत एक 9 वर्षाचा मुलगा वेदनेने कळवळत असतो…

“कायको मारा बे उसको?”

“काम करत नव्हता तो..”

“कौन लागता है तेरा..”

“भतीजा…”

सासूबाई ते बघत असतात, त्यांचं मन भूतकाळात जातं……आई वडिलांची ऐपत नसल्याने त्यांना मामा कडे ठेवण्यात आलेलं..तिथे त्यांना अशीच मारहाण व्हायची..त्यांना त्या मुला मध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसू लागतं… त्यांचा संताप अनावर होतो..त्यांनी सोबत आणलेला बेल्ट त्या काढतात आणि त्या माणसाला बदडायला सुरवात करतात…तो माणूस विव्हळतो पण सासूबाईंना अजिबात दया येत नाही…

क्रमशः

(मागील सर्व भाग गुगल वर sanjana ingale’s blog असं टाकून बघू शकता)

4 thoughts on “मवाली सून (भाग 5)”

Leave a Comment