मनाचे खेळ-3

 तिच्या कामाचं कुणी कौतुक केलं की म्हणायची,

“हो पण आईंसारखं नाही जमलं हो..आई त्या आईच..”

बस त्या एका वाक्याने आईला समाधान मिळायचं,

ती आईपुढे नम्र असायची,

एकदा सासरे म्हणाले,

घर बांधून ठेवशील पोरी तू..

ती म्हणाली,

“अहो बाबा माझ्या आधीच आईंनी घराचं नंदनवन केलंय, मला तर आयतं सगळं मिळतंय..त्यांचीच कृपा..”

बायकोच्या वागण्याने आईची असुरक्षितता निघून गेली,

अखेर आईनेच मान्य केलं, 

तू माझ्याहून वरचढ आहेस आणि मला त्याचा अभिमान आहे..

तिच्याकडून मी शिकलो,

आपण कितीही मोठे असलो, हुशार असलो,

तरी समोरच्या माणसाच्या अनुभवाचा आदर करायचा,

त्याच्यासमोर नम्र व्हायचं,

आपण जेवढे लहान बनू तेवढे महान होतो..

बस,

 

कंपनीतही मी हेच केलं,

राठी मॅडम, 

खूप जुन्या, अनुभवी व्यक्ती..

कुणी नवीन आलं की त्यांच्याही मनात असुरक्षितता निर्माण होई,

कारण त्यांची पिढी पेपर वर्क करणारी,

आपली ऑनलाइन..

त्यांना ते फारसं जमत नसे,

मग त्यांना अपराधी वाटायचं, आणि सोबतच आपल्याहून लहान कर्मचाऱ्यांसमोर आपलं अज्ञान दिसतं म्हणून चिडचिड व्हायची,

नवीन आलेले कर्मचारी त्यांच्या या कमतरतेवर हसायचे,

मी तसं केलं नाही, त्यांचा आदर केला..

नवीन टेक्नॉलॉजी त्यांना शिकवली,

म्हणायचो,

मॅडम, तुमच्या वेळी असलेलं पेपर वर्क बेस्ट होतं..पण आता काय, सगळं ऑनलाइन झालं..आलिया भोगासी…

त्या हसायच्या…

मी म्हणायचो,

मॅडम तुमच्या इतकं परफेक्ट काम जमणार नाही मला पण प्रयत्न करतो,

त्यांच्या डोळ्यात वेगळीच चमक यायची..

तसेच आपले नेरकर सर,

त्यांना न सांगता बरेच कर्मचारी त्यांची मतं मांडायचे, नवनवीन आयडिया द्यायचे,

पण मी मात्र कुठलीही गोष्ट करायच्या आधी त्यांचं मत विचारायचो,

तुमचा अनुभव जास्त आहे त्यामुळे तुमचं मत माझ्यासाठी महत्वाचं आहे, असं म्हणायचो,

त्यांना खूप भारी वाटायचं..

मी माझं काम करत गेलो,

पण नम्रतेने,

सिनियर्स चा आदर ठेऊन,

त्यांना त्यांचा मान देऊन,

जे मी माझ्या बायकोकडून शिकलो,

म्हणून माझ्या यशाचं श्रेय माझ्या बायकोलाच..!!!

समाप्त

Leave a Comment