भाकित (अंतिम)

 #भाकित (अंतिम)

भाग 1

https://www.irablogging.in/2021/01/1.html

भाग 2

https://www.irablogging.in/2021/01/2.html

भाग 3

https://www.irablogging.in/2021/01/3.html

भाग 4

https://www.irablogging.in/2021/01/4.html?m=1

भाग 5

https://www.irablogging.in/2021/01/5.html

भाग 6

https://www.irablogging.in/2021/01/6.html?m=1

माणसाच्या मृत्यूची तारीख ओळखण्यात हे सॉफ्टवेअर यशस्वी झालं होतं, पण सारंगला अजून काहीतरी हवं होतं. आयुष्यात अनेक घटना घडतात, काही चांगल्या काही वाईट. कुणाला अनपेक्षितपणे धनलाभ होतो, कुणाला नोकरीतून अचानक काढण्यात येतं, कुणाला नात्यात अचानक दुरावा येतो, कुणाला अनपेक्षितपणे आनंद प्राप्त होतो. हे सगळं अनपेक्षित असलं तरी ते ज्याच्या त्याच्या कर्माने अपेक्षितच असतं. एखाद्याला चांगल्या कर्माचं फळ उशिरा का असेना पण मिळतं, एखाद्याला वाईट कर्माचे भोग चुकतच नाहीत. याबद्दल आपण प्रोग्राम बनवला तर? 

हे काम सारंगने स्वतःकडे घेतलं. त्याने डायरीमधल्या घडलेल्या घटना डेटाबेस मध्ये पूर्ण टाकल्या आहेत का हे एकदा चेक केलं. त्या घटनांवर प्रोग्रॅम रन केला. काही घटना रिपीटेड होत्या..म्हणजे दिगंबर नावाच्या एका व्यक्तीने दर आठवड्याला गरिबांना दान करण्याचं काम केलं होतं, त्याच्या वृद्धापकाळी अचानक पैशांची चणचण भासलेली तेव्हा कुणी केशव नावाच्या व्यक्तीने त्याला एक चेक दिला होता अन तो आजारातून बरा झालेला. अनिल नावाच्या व्यक्तीने त्याच्या फॅक्टरी साठी जमिनीवरील 50 झाडं तोडली होती, त्या झाडांवर पक्ष्यांची घरटीही होती, अनिल व्यवसायात खूप पुढे गेला, खूप श्रीमंत झाला आणि एके दिवशी त्याच्या फॅक्टरीत केशव नावाच्या व्यक्तीकडून आग लागली अन क्षणात फॅक्टरी भस्मसात झालेली. आशुतोष नावाची एक व्यक्ती, चुगली करण्यात अन भांडणात अग्रेसर..वाचाळ भाषेमुळे तो प्रसिद्ध, वयाच्या 45व्या वर्षी डॉक्टर केशवने  घश्याच्या कॅन्सरचं निदान केलं आणि लवकरच आशुतोषने जग सोडलं…

सदर घटना एकमेकांशी काही अर्थी संबंधित होत्या. सारंगने पोसिटिव्ह अँड निगेटिव्ह.. अश्या दोन कॅटेगरी केल्या आणि पोसिटिव्ह मध्ये चांगली कर्म, निगेटिव्ह मध्ये वाईट कर्म विभागले. त्यांचा आपापसातील संबंध नोट होईल असा प्रोग्रॅम बनवला.

हे काम फारच किचकट होतं, ज्याच्या त्याच्या कर्माची विभागणी करणं, त्याचा संबंध नंतर घडलेल्या घटनांशी लावणं आणि योग्य ते भाकित दाखवणं हे फक्त सारंगला जमू शकणार होतं. 

दीड महिना सारंगने यावर काम केलं, प्रोजेक्ट सुरू झाला त्या दिवसापासून सारंग आणि त्याचे सर्व टीम मेम्बरही रोजचा दिनक्रम, घटना डेटाबेस मध्ये अपडेट करत होते. सारंगला एवढं करूनही काहीतरी मिसिंग वाटत होतं. रात्री उशिरापर्यंत त्याने काम केलं, डोळा लागणार तोच तो खाडकन उठून बसला..

“वरच्या सर्व घटनांत एक पात्र सगळीकडे आहे…”केशव..केशव म्हणजे, मला ज्याने निराशेतून उभं केलं तो ड्रायव्हर.. मग दिगंबर ला चेक देणारा केशव कोण? अनिलच्या फॅक्टरीत आग लावणारा केशव कोण? आशुतोष ला कर्करोगाचं निदान करणारा डॉक्टर केशव कोण? सर्वांची नावं सारखी कशी?? 

विचारांनी सारंगच्या मनात धुमाकूळ घातला, 

“केशव…केशव..अरे कोण आहे हा केशव??”

“मीच तो..जिथे सकारात्मकता असते तो केशव…जिथे प्रेम असतं तो केशव…यदा यदा ही धर्मस्य… जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल, तेव्हा धर्माला उभं करायला, सज्जनांना साथ दयायला अन दुर्जनांचा विध्वंस करायला मी पुन्हा पुन्हा जन्म घेईन…पुन्हा पुन्हा जन्म घेईन..”

“केशवा…”

सारंग झोपेतून जागा होतो..स्वप्नात त्याला त्याचा ड्रायव्हर केशव एक वेगळ्याच रुपात दिसलेला..त्याने जे म्हटलं ते शब्द सारंगने पहिल्यांदाच ऐकले होते..”यदा यदा ही धर्मस्य..”

सारंग या शब्दांचा अर्थ नेटवर बघतो, त्याला समजतं की हे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं आहे. कदाचित हा संकेत असावा, कर्माचं भाकित यात तर नसेल??

सारंग गीतेचा अनुवाद वाचायला घेतो. भक्त कसा असतो, चांगल्या मनुष्याचे गुण कोणते, जगणं कसं असायला हवं, सृष्टीकडे बघण्याची दृष्टी कशी हवी या सर्वांचं मार्गदर्शन होतं.. जेव्हा “यदा यदा ही धर्मस्य..” ची ओळ आली तेव्हा सारंगसमोर केशवची छबी आली..दिगंबर नावाच्या सज्जनाची सुरक्षा करायला…अनिल आणि आशुतोष सारख्या अधर्मीचा नाश करायला आणि गलितगात्र झालेल्या त्याला स्वतःला पुन्हा सज्ज करायला हाच केशव आलेला…

“केशव हा व्यक्ती नाहीये, कर्म अकर्माचं भाकित करणारा…आज मी जे सॉफ्टवेअर बनवत आहे त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे केशव..केशव म्हणजे मार्ग दाखवणारी, कर्त्याला त्याच्या कर्माचं योग्य फळ देणारी एक शक्ती…”

सारंग सॉफ्टवेअर च्या अंतिम टप्प्यात आला असता त्याने एक ट्रायल करायची ठरवली..प्रथम त्याने स्वतःचं भाकित पडताळून पाहायचं ठरवलं..आणि सॉफ्टवेअर त्याचं काम तंतोतंत बजावत होता. सारंगची जी भाकितं दिसत होती त्याला सारंग डोळे विस्फारून बघत होता.

दुसऱ्या दिवशी सर्व टीम जमा झालेली, सारंगने कुणालाही सिस्टीम सुरू करायला लावली नाही, सर्वांना खुर्चीवर बसवत त्याने मिटिंग घेतली.

“आपलं काम पूर्णपणे यशस्वी झालं आहे, आपण आता हे सॉफ्टवेअर डिप्लोय करणार आहोत पण त्या आधी मला काहींना प्रश्न विचारायचे आहेत..”

सर्वजण कान देऊन ऐकू लागले..

“चेतन, अमन वर्मा ने तुला किती पैसे दिलेत??”

या प्रश्नाने सर्वजण गोंधळून गेले..चेतनला तर घामच फुटला..

“चेतन, सॉफ्टवेअर डिप्लोयमेंट चं काम तुला दिलेलं..अमन वर्माने तुला 25 लाखाचं आमिष दाखवून सॉफ्टवेअर त्याला पुरवायला लावलं होतं.. बरोबर? पण एक गोष्ट तू विसरलास, सिस्टीम पासवर्ड शिवाय तुला ते डिप्लोय करता येणार नाही आणि तो पासवर्ड फक्त माझ्याकडे आहे..”

मंगेश अन तुषार चेतनच्या अंगावर धावून गेले….

“गद्दार…आमची मेहनत दुसऱ्याला विकायला निघालेलास??”

“सोडा त्याला..त्याचं अज्ञान त्याला नडलं.. आपण जे सॉफ्टवेअर बनवतो आहोत त्यात त्याचेही दिनक्रम होते, त्याने आजवर अनेक घोळ केलेत आणि या क्षणाला तो काय घोळ घालू शकतो याचं भाकित मला कालच दिसलेलं…”

“याला पोलिसांच्या हवाली करूया..”

“काही गरज नाही, याचं कर्मच याला शिक्षा देईल..”

“कसं?”

“याचं भाकित स्क्रीनवर दिसलं..याचा मुलगा चोरी करेल, पोलीस याच्या घरी पोचले असतील..”

चेतन घाबरतो, त्याच्या फोनची रिंग वाजते..

“हॅलो.. काय?? पोलीस??”

चेतन पळतच घरी जातो.. इतर टीम मेम्बर आपापली भाकीतं बघतात, मंगेश हळूच सारंगला विचारतो..

“तुझ्या वैवाहिक आयुष्याचं काय भाकित आहे??”

सारंग हसतो..

“माझं भविष्य दार ठोठावेल पुढच्या 3 मिनिटात..”

मंगेश घड्याळात तीन मिनिटं मोजतो, तिसरा मिनिट संपताच बेल वाजते.. मंगेश दार उघडतो..

अविर आईचा हात सोडून चटकन बाबाला येऊन बिलगतो..ईशानीच्या हातातल्या तीन भरगच्च बॅग्स पाहून सारंग आनंदतो..

“कसे आले तुम्ही?? मला घ्यायला बोलावलं असतं..”

“सांगितलं असतं, पण इतक्यात आईला एका व्यक्तीने त्याचा गाडीने आम्हाला सोडण्याचं सांगितलं आणि आम्ही येऊन गेलो..”

“काय नाव त्याचं??”

“केशव…”

हे नाव कितीतरी वेळ वातावरणात घुमत होतं..

समाप्त

7 thoughts on “भाकित (अंतिम)”

Leave a Comment