फरक-3

 आल्यावर पाहते तर काय,

मुलगी ओट्यासमोर उभी राहून स्वयंपाक करत होती,

आईचा संताप झाला,

कुठे गेली तुझी वहिनी तुला कामाला लावून?

आई शांत हो, दादाने पिक्चरची तिकिटं काढलेली, वहिनीला न सांगता..वहिनी नाहीच म्हणत होती पण मी बळजबरीने पाठवलं..

तू का लाडवून ठेवतेस तिला? नसती गेली तर काय बिघडलं असतं तिचं?

आई तू इतकी चिडचिड का करतेय कळतंय मला..

ते ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आलं..

नणंद आईला घेऊन खोलीत गेली आणि खुर्चीवर बसवून शांत केलं..

आई बोलायला लागली,

तुझं लग्न झालं तेव्हाचं आठवतंय..

जावईबापू तुला कसे वागवत पाहिलेलं मी..

माहेरी भावाच्या लग्नाला पाठवायचं होतं तेव्हा हळदीच्या दिवशी जा म्हणून बजावलं त्यांनी, तू आठ दिवस आधी जाते म्हटलं होतंस तर अक्षरशः मारलेलं तुला..

कधी बाहेर फिरणं नाही की कधी निवांत वेळ घालवणं नाही..

आयुष्यभर तू केवळ सेवा केलीस सासरच्या लोकांची..

जावईबापूंनी बायको म्हणून कधी मान दिलाय तुला? 

कधीही आले की तोंड वाकडंच त्यांचं..

त्यात तुझी नणंद आणि सासू, टोमणे मारायला एकही संधी सोडली नाही त्यांनी..

आणि दुसरीकडे तू..तुझ्या वहिनीला स्वातंत्र्य मिळावं म्हणून सगळं अंगावर ओढून घेतेस..

“आई शांत हो, माझ्या बाबतीत जे झालं ते झालं..पण आता तुझा जावई सुधारला आहे, बरा वागतो…माझी काळजी करू नकोस..आणि आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्यालाही मिळू नये हा कसला न्याय?

उलट आपण ज्या दुःखद परिस्थितीतून गेलो ती दुसऱ्यावर येऊ नये यासाठी प्रयत्न करणं यात वेगळंच समाधान असतं आई…मला जे सुख मिळालं नाही ते किमान वहिनीला तरी मिळतंय हे बघून खुप बरं वाटतं मला…याउलट मला जो त्रास झाला तसाच आपण वाहिनीला दिला तर माझ्या सासरचे आणि तिच्या सासरचे यात फरक तो काय?”

आईला चूक समजली,

आपण संस्कार केलेली मुलगी आज आपल्यालाच चार गोष्टी समजावतेय हे पाहून आईला वाईट नाही तर कौतुकच वाटलं…

***

जगात दोन प्रकारची लोकं असतात,

आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्यालाही मिळू नये म्हणून कटकारस्थानं करणारे,

आणि दुसरे, आपल्याला जे मिळालं नाही ते निदान दुसऱ्याला तरी मिळावं यासाठी प्रयत्न करणारे…

आपण कोणत्या प्रकारात असावं, हे ज्याचं त्याने ठरवावं..

समाप्त

7 thoughts on “फरक-3”

  1. खरंच खूप छान कथा आपणही दुसरा वाईट वागतो म्हणून आपणही वाईट वागले पाहिजे असे नाही मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय

    Reply
  2. खरच खूप छान कथा आहे.. मस्त वाटल वाचून… नणंद आनि वाहिनीच नात ❤️❤️

    Reply
  3. असेच विचार सर्वांनी ठेवले पाहिजेत. दुसर्याच्या दुःखात सुख मानणे हे माणुसकीच्या विरुद्ध आहे

    Reply

Leave a Comment