फरक-2

वहिनीही प्रेमळ, नणंदबाईंना सासरी कसा त्रास झालेला हे ओळखून होती, त्यामुळे तिला पुरेपूर माहेर पुरवण्याचं काम ती करत होती..

आई मंदिरात गेली, वहिनी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली..

तेवढ्यात तिला एक फोन आला,

नणंद ऐकत होती,

वहिनी चिडून बोलत होती,

“मला न विचारता तिकिटं काढलीच कशी? तुम्हाला समजत नाही का घरी ताई आल्या आहेत ते?”

“अगं नवीनच आलाय चित्रपट.. म्हटलं जाऊन येऊ..”

“तुम्हाला ना वेळ काळ कसलंच भान नसतं..मी येणार नाही, पण ताईंना विचारते थांबा..”

फोन बाजूला करून वहिनी नणंदेला म्हणाली,

“ताई, अहो तुमच्या दादांनी दोन तिकिटं काढली आहेत, नवीन पिच्चर नाही आलेला का तो..त्याची…तुम्ही तयार व्हा, जाऊन या दोघे.”

“अगं मी मागच्या आठवड्यातच पाहिलाय तो चित्रपट.. परत पाहायला नको वाटतं. तुला बोलावलं आहे तू जा की वहिनी..”

“नका हो ताई, अजून एवढा स्वयंपाक बाकिये..जेवायची वेळ होत आली..”

“वहिनी ऐक माझं…तू खरंच जा, तू गेली नाहीस तर मला खूप वाईट वाटेल,

मी बघून घेईल घरातलं सगळं..काळजी करू नकोस.  भात शिजतोय, वरणाला फोडणी देऊन देईन..आणि कणिक पण मळलंय वाटतं, पोळ्या पटकन होऊन जातील..तू जा बरं आधी..”

“अहो ताई पण..”

नणंदेने वहिनीला बळजबरी आवरायला पाठवलं..

वहिनीने दादाला फोन करून होकार कळवला, दादा ऑफिसहून आला आणि दोघे लगेच गेले..

आई मंदिरातून परतली,

भाग 3

https://www.irablogging.in/2022/12/3_15.html?m=1

1 thought on “फरक-2”

Leave a Comment