फरक-1

“वहिनी अगं तू जा दादासोबत बाहेर, मी आहे घरातलं बघायला”

“नको ताई, तिकडे जाणं इतकं काही महत्वाचं नाही, तुम्ही आराम करा..मी आहे इथेच, कुठेच नाही जात..”

नणंद भावजयीचा प्रेमळ संवाद सुरू होता..

आणि आई कोपऱ्यात उभी राहून मुलीवर चिडत होती..

“तुला सासरी काही कमी कामं असतात का जे इथेही करायला बघतेस? आराम करायचा सोडून कशाला किचनमध्ये येतेस बरं?”

नणंदेने तिच्या वाहिनीचे असे लाड केलेले आईला आवडत नव्हते…

पण नणंदबाई आपला प्रेमळ स्वभाव सोडू शकत नव्हत्या..

खुप महिन्यानंतर त्या माहेरी आलेल्या,

लग्न होऊन दहा वर्षे झालेली,

सासर जुन्या वळणाचं, शिस्तीचं..

आज इतक्या वर्षांनी मुलगी आली आहे म्हटल्यावर आईने सुनेला सांगून सगळी हौसमौज पुरवली..

भाग 2

https://irablogging.in/%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a4%95-2/

भाग 3

https://irablogging.in/%e0%a4%ab%e0%a4%b0%e0%a4%95-3/

Leave a Comment