सोबत बाकीच्या सुना होत्या मदतीला,
मस्त मांडी घालून सासरचे गाऱ्हाणे सांगत होत्या,
कामं लांबच,
रचनाला ते काही जमायचं नाही,
कामं उरकण्याकडे तिचा कल,
नणंद नुकतीच पार्लर मधून आलेली,
ती आणि तिच्या मैत्रिणींची रेलचेल सुरू होती,
“अगं हे यावर match होतंय का? नाहीतर दुसरं बघू..”
“अगं फेशियल केलंय ना, मग चेहऱ्याला हळद लागू देऊ नकोस”
रचनाला तिच्या लग्नाचे दिवस आठवले आणि हसू आलं..
लग्नाचा दिवस उजाडला,
रचनाला सर्वांच्या आधी उठणं भाग होतं,
कारण सर्वांना चहा, नाष्टा देऊन लग्नाच्या हॉल कडे जायचं होतं,
तिला तयारीला वेळ मिळणार नाही हे तिला माहीत होतं,
सकाळचे 8 वाजले,
एकेकाचा चहा नाष्टा सुरू झाला,
तेवढ्यात मोठ्याने किंचाळण्याचा आवाज आला,
सगळेजण त्या दिशेने धावले,
नवरी रडत होती,
सगळे विचारू लागले, काय झालं म्हणून..
मैत्रिणी म्हणाल्या,
तिच्या लग्नाचा लेहेंगा उंदराने कुरतडला..
सगळेजण गंभीर झाले,
काय करावं सुचेना,
चांगला 15-20 हजाराचा लेहेंगा,
खाली जवळपास अर्धा भाग कुरतडला होता,
रचनाची सासू पुढे आली,
“अरे देवा, आता काय करायचं?”
रचना पटकन पुढे आली, म्हणाली..
“आई मी काय म्हणते..”
“तू थांब गं… शलाका तुझ्या ओळखीत एखादा टेलर असेल तर सांगून बघायचं का?”
रचनाचं वाक्य मधेच तोडत त्या म्हणाल्या,
“नाही ओ काकू, गावात कुणीच टेलर नाही..पण रचना वहिनी शिवतात ना ब्लाउज, वहिनी काही करता येईल का?”
रचना काही बोलायच्या आधीच सासू म्हणाली,
“अगं तिला काय येईल ते..”
“अहो आई मी सांगते ना की..”
भाग 3
पलीकडलं रूप-3
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.