निखारा – एक थरारक कथा (भाग 6)

नासिर आणि अहमद शब्बीर चाचा च्या मोबाईल लोकेशन वरून त्यांचा पिछा करतात…भारत पाक सीमेजवळ त्यांचं लोकेशन दिसतं..
“बहोत शातिर है ये शबाना…शब्बीर चाचा ला आपण गाठू नये म्हणून आधीच त्याला हिंदुस्थानात पाठवून दिलं..”
“अजून गेला नाहीये तो..आपण त्याचा पिछा सोडायचा नाही…”
इकडे यासिन शबाना सोबत बोलत असतो…
“रविवारी सर्व जिहादी एकत्र येणार आहेत..सर्व व्यवस्था झालीये…”
“बहुत अच्छे…”
“भाभीजान….पटेल मैदानावर हल्ला झाला तिथली आपली 3 माणसं अजून परत आलेली नाहीये…त्यांच्याशी सम्पर्क होत नाहीये..”
“त्यांना मीच सांगितलंय तिथे थांबायला…पुन्हा पुन्हा सीमा पार करणं अवघड असेल.रविवारी जी घोषणा होईल तेव्हा त्या मिशन साठी त्यांना तिथेच काम करावं लागेल…”
“ठीक आहे भाभीजान..”
तिकडे नासिर आणि अहमद सीमेजवळ पोचतात…त्यांना लोकेशन पाहिलं तर शब्बीर चाचा केव्हाच सीमा पार करून गेलेले असतात..
“हमे भी ये पार करना होगा…”
ज्या छुप्या मार्गाने जिहादी सीमा पार करत तिथून हे दोघे घुसखोरी करतात…
रात्र होते..शब्बीर चाचा चं लोकेशनही आता दिसत नव्हतं…
“कुठे गेला असेल हा??”
“अहमद…बहुत थक गये हम… चलो कहीपे रुकते है..सुबह धुंडेंगे…”
“हो पण कुठे थांबायचं?”
समोर एक मंदिर असतं….
“सलमान ला याच लोकांनी कसं मारलं होतं विसरला का…ही लोकं काय आपल्याला सहारा देतील..आपण मुस्लिम आहोत हे ओळखून ही लोकं आपल्याला इथेच संपवतील..”
“बरोबर आहे…चल पूढे जाऊ..”
इतक्यात एक आवाज येतो..
“भैय्या…किधर??”
“कुठे नाही…सहज…”
“इथे या…”
अहमद आणि नासिर घाबरत तिकडे जातात…
“देवाच्या दरबारात कुणीही रिकाम्या हाताने परत जात नाही…लांबून आलेले दिसताय…तिकडे एक धर्मशाळा आहे…तिथे जाऊन फ्रेश व्हा, मी जेवणाची व्यवस्था करतो..”
इतक्या आपुलकीने त्या पुजाऱ्याने सांगितलं की ह्या दोघांना नाही म्हणणं शक्यच नव्हतं…
दोघांनी तिथे आराम केला…पुजाऱ्याने घरून डबा आणून दिला…दोघांनी त्यावर ताव मारला आणि गाढ झोपी गेले..
दुसऱ्या दिवशी त्यांना मंदिराच्या त्या मंजुळ मंत्रांनी जाग आली..त्यांची पावलं मंदिराकडे वळली…पुजाऱ्याने त्यांना कुंकू लावायला हात पुढे केला तसे ते मागे झाले…
“आम्ही मूलसमान आहोत..”
“देवाच्या दरबारात धर्माचं बंधन नसतं…ज्यात माणुसकी असते, प्रेम असतं आणि जो सत्याच्या रस्त्याने चालतो तो हिंदू धर्म…मग असा वागणारा मुस्लिमही हिंदूच असतो आणि ख्रिश्चनही हिंदूच असतो…”
सलमान ला मारणारी ती हीच लोकं का? असे विचार असणारी माणसं सलमान ला खरंच मारू शकतात? सलमान च्या मारण्याची खबर खरी होती की….केवळ भडकवण्यासाठी….?
“भाईजान..प्रसाद…”
एक मुलगा हात पुढे करतो आणि हे दोघेही दचकून मागे जातात..
“सलमान????”
सलमान घाबरत तिथून पळून जातो..
पुजारी सांगतो…
“कुण्या अतिरेक्यांनी त्याला पळवून बंदिस्त केलं होतं… कसाबसा सुटका करून तो इथे आला, आम्ही त्याला आसरा दिला..”
नासिर आणि अहमद ला आता समजलं होतं, की जिहादींना बिथरवायला हे सगळं खोटं नाट्य घडवलं जात होतं…
नासिर आणि अहमद तिथून निघतात ते जड मनानेच…
आपण जिहाद च्या नावाखाली चुकतोय का? हिंदूंबद्दल आपल्यात गैरसमज पसरवला जातोय का?
ते काहीही असो, पण आपण इथे शब्बीर चाचा ला शोधायला आलोय….पुन्हा ते आपल्या कामाला लागले…
लोकेशन पुन्हा दिसायला लागतं, शब्बीर चाचा जवळच्याच एका वस्तीत असतात…
लोकेशन नुसार ते जवळ जातात, एक पडकं घर नजरेस येतं..
“हेच लोकेशन आहे..शब्बीर चाचा इथेच आहे…चल लवकर पकड त्याला…”
दोघेही घराचं दार वाजवतात..पण दार उघडच असतं… ते आपली हत्यारं वर काढतात…हळूच आत जातात..खोलीत अंधार असतो…नासिर खिडकी उघडतो तसा खोलीत प्रकाश पसरतो…
“आलात?? तुमचीच वाट बघत होतो..”
शब्बीर चाचा पाठमोरे उभे राहून त्यांच्याशी बोलतात..
“तुम्हाला माहीत होतं आम्ही इथे येणार ते??”
“होय…”
“कुणी सांगितलं??”
“शिवानी ने…म्हणजेच…तुमच्या शबाना बेगम ने…”
क्रमशः


Leave a Comment