निखारा – एक थरारक कथा (भाग 4)

नासिर पुरता तोंडघशी पडला…शबाना त्याला म्हणाली,
“सीमा पार करताना आपण हिंदू आहोत याचा खात्रीसाठी गीता सोबत बाळगणं मला भाग आहे…आणि माझ्या खोलीत घुसून माझा मेल बघण्यापर्यंत तुझी मजल गेली??”
टोळीतील लोकं संतापतात…
“याला हद्दपार करा…”
“शबाना बेगम वर आरोप म्हणजे आमच्या अब्दूलमियाचा अपमान…”
टोळीने अपमानित करून नासिर ला टोळीतून बेदखल केलं…
नासिर धुसफूसत तिथून निघून जातो..त्याला अजूनही खात्री असते, की शबाना हिंदूच आहे…
इकडे शबाना आणि टोळीचा हल्ला यशस्वी झाल्याचा आनंद साजरा होत असतो…शबाना चं कौतुक होतं. आणि जिहाद साठी अश्या अनेक हल्ल्यांना यशस्वी करण्याचा जोश सर्वांमध्ये येतो…काश्मिरी मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराच्या खोट्या व्हिडीओ ला भुलून सर्व दहशतवादी पेटलेले असतात…
शबाना त्या पार्टीत नवीन घोषणा करते…
“आपलं ध्येय एक आहे..जिहाद साठी आपण आपल्या प्राणाची आहुती द्यायलाही मागे पुढे पाहणार नाही…”
इतक्यात एकाच्या मोबाईल वर एक बातमी येते…
काश्मीर मध्ये सलमान नावाच्या एका तरुणाची भारतीय सैनिकांनी निर्घृणपणे हत्या केली..
पार्टीमध्ये या एका बातमीने सर्वजण संतापतात..एक जण बंदूक उचलतो आणि म्हणतो..
“फर्मान सोडा शबाना बेगम..आत्ताच्या आत्ता जाऊन एकेक सैनिकाला गोळ्या घालतो..”
“तू एकटाच का? आम्हीही सोबत येतो…”
शबाना सर्वांना शांत राहायला सांगते…
“रागाच्या भरात कुठलंही पाऊल उचलायचं नाही…आता सैन्याला त्यांची जागा दाखवण्यासाठी आपली पुढची योजना असेल…एक अशी योजना, जिथे फक्त आपण नाही, तर जिहाद साठी लढणाऱ्या असंख्य संघटना एकत्र येणार… आणि पुढच्या अनेक पिढ्या हिंदुस्थान या हल्ल्याची किंमत मोजेल..”
शबाना च्या या आश्वासनाने माणसं शांत झाली..
संध्याकाळी शबाना तिच्या खोलीत जाते, दार लावून बसते…
ती सैरभैर होते, जी बातमी आली ती खरी होती का? त्यात तथ् होतं का?
अश्या बातम्या यायची ही पहिली वेळ नव्हती…अश्या कितीतरी बातम्या येऊन ठेपायच्या…जिहादींना उकसवायच्या… आणि पुन्हा त्वेषाने अजून हल्ले चढवले जायचे…
अबिदाजान ने खोलीबाहेर उभं राहून आवाज दिला…
“बेगम..जेवायला चला..”
शबाना दार उघडते…
“अबिदाजान..आज कसं खाऊ मी?”
अबिदाजान ला शबाना च्या या विशिष्ट दिवशी केलेल्या उपासाचं काही समजतच नव्हतं…हे उपासाचे दिवस ना रमजानचे असायचे ना कुठल्या त्योहार चे…मग असं का?
अबिदाजान ने कधीच याबद्दल विचारलं नाही…पण मनात प्रश्नचिन्ह कायम असायचं…
तिकडे नासिर ची धुसफूस चालूच होती…टोळीत होता तोवर त्याला शबाना ची माहिती काढता येत होती, पण आता तोही मार्ग बंद झालेला…
नासिर ने अहमद ला, म्हणजेच शबाना च्या दिराला भेटायचा प्रयत्न केला..तो एकमेव असा होता की ज्याला शबाना चं वर्चस्व मान्य नव्हतं…अहमद च्या मदतीने शबाना चं खरं रूप त्याला जगासमोर आणायचं होतं…
अबिदाजान ने घरातलं सामान संपलं म्हणून यासिन ला किराणा आणायला पाठवलं…
“अबिदाजान… काश्मीर मध्ये एकाला मारलं…त्यामुळे इलाख्यात बंद पाळला आहे…दुकानं बंद असतील..”
“मग पुढे जा…वजीराबाद ला..”
“तिथे सगळी हिंदू वस्ती आहे…”
“मग? हिंदूं लोकं माणसं नसतात का?”
यासिन चे पाय तरीही वळत नाही..हिंदूबाबतीत त्याला कमालीची चीड…
“हे बघ यासिन…जगण्यासाठी फक्त जिहाद पुरेसा नाही…पोटात दोन घास गेले तर लढता येईल..”
नाईलाजाने यासिन तिथून किराणा आणून देतो…
अबिदाजान ते सामान घेते, आणि एकेक वस्तू जागेवर ठेवायला लागते..
काही वस्तू वर्तमानपत्रात गुंडाळलेल्या असतात…तर काही एका कॅलेंडर च्या पानात…
अबिदाजान सहज म्हणून हिंदू कॅलेंडर चा तो कागद बघते…मागच्याच महिन्याचं कॅलेंडर असतं ..त्यात सर्व हिंदू सण उत्सव यांची माहिती असते…
अबिदाजान श्वास रोखून धरते…
एकादशी… चतुर्थी…

नेमके याच दिवशी शबाना उपास पकडते…म्हणजे…शबाना????


1 thought on “निखारा – एक थरारक कथा (भाग 4)”

Leave a Comment