नशिबाची थट्टा-2

त्यातल्या त्यात एक मुलालाही पसंत पडली आणि रेखाताईंचा जीव भांड्यात पडला..

सुनबाई गावाकडे एका लहानशा घरात राहत होती,

लग्न झाल्यानंतर ती घरात आली, रेखाताईंनी सुटकेचा निःश्वास सोडला,

“आता सुनेवर सगळं सोपवून मी मोकळी”

घड्याळाकडे पाहिलं, 9 वाजून गेलेले,

किचनमध्ये अजूनही काही आवाज ऐकू येत नव्हता,

त्या पाहायला आल्या,

सुनबाई अजून उठली नव्हती..

“लग्नाची दगदग.. असो, उद्यापासून उठेल लवकर”

स्वतःची समजूत घालत त्या कामाला लागल्या,

दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही तेच,

चौथ्या दिवशी सुनबाई मस्तपैकी जीन्स, शॉर्ट टॉप घालून किचनमध्ये आली,

“आई सरकता का, मला ब्लॅक टी ठेवायचाय”

सासुबाई गांगरून गेल्या,

“आणि काही स्वयंपाक करायचा आहे का? मी करून घेते, आम्हाला ना शॉपिंग साठी जायचं आहे बाहेर, यायला उशीर होईल”

रेखाताई आ वासून बघतच राहिल्या,

“जा बाबांनो, मी बघून घेईल स्वैपाक”

गावाकडे एवढ्याश्या घरात राहणाऱ्या मुलीला अचानक शहरी वातावरण मिळालं आणि तिचे नखरेच एकदम बदलून गेले,

जेवायला अमुक एक पदार्थच हवे,

शिळं खाणार नाही,

कामाला बायका असतात, त्यामुळे कशाला हात लावायचा नाही,

नाश्त्याला महागडे फ्रुटसच हवेत ,

दिवसाआड तरी नवरा बायको बाहेर फिरायला नाहीतर जेवायला जाणार,

रेखाताई डोक्याला हात लावून बसल्या,

काय विचार केलेला अन काय होऊन बसलं..

तेव्हा नुकतंच शेजारच्या गाण्याचं लग्न झालं होतं,

त्याची बायको सकाळी 9 वाजता स्कुटरला किक मारून बाहेर पडतांना दिसली, रेखाताईंना राहवलं नाही, त्या तडक गाण्याच्या आईकडे गेल्या,

“काय हो, सकाळी सकाळी कुठे गेली तुमची सून?”

“नोकरी वर जाते, माझ्या मुलाने त्याच्याच पसंतीची शोधून आणलीय, गुणाची आहे हो पोर…त्यांच्या पसंतीचा आम्ही मान राखला म्हणून आमचा मान ते दोघे राखताय,जबाबदारीने वागताय, माझी सून बघा..नोकरीवर जायचं म्हणून सकाळी लवकर उठून, स्वैपाक, झाडझुड करून गेली कामावर..संध्याकाळी आल्यावर परत कामाला लागणार, आणि वर माझ्या हातात पगारातले काही पैसेही देणार, तुम्हाला सांगते रेखाताई, फार फरक पडतो हो असे जास्तीचे पैसे हातात असले की”

*****

भाग 3

नशिबाची थट्टा-3

2 thoughts on “नशिबाची थट्टा-2”

Leave a Comment