धुरा (भाग 5) ©संजना इंगळे

तेजु चा बाबांच्या ऑफिस मध्ये दिवसरात्र अभ्यास चालू होता, इतक्यात तिच्या फोनवर लारा चा मेसेज..

“Hope you are better now, when will you return?”

तेजु तिला सांगते..

“I am resigning that job, now joining the politics after my dad..”

“Are you serious? Think again teju… you already hate that field…”

“My decision is final…”

तिच्या या उत्तरानंतर लारा ला काय बोलावं कळत नाही, ती रिप्लाय देत नाही..आणि तेजु पून्हा आपल्या कामात मग्न होऊन जाते..

निवडणूक जवळ येत असते आणि आईच्या मनातली धाकधूक वाढत असते ..

“तेजु…तुझ्या सांगण्याप्रमाणे प्रचाराला आम्ही यावेळी स्थगिती दिली..पण तू काही हातपाय हलवणार आहेस की नाही??”

“हो….उद्या सर्व मीडिया ला बोलवा…tv वर लाईव्ह टेलिकास्ट करायला सांगा…उद्या सगळं उघड होईल…”

तेजु दुसऱ्या दिवसाची तयारी करत असते…आई येते अन विचारते,

“तेजु…बघ उद्या कुठली साडी नेसशील?? ही पिवळी की गुलाबी??”

तेजु क्षणभर विचार करते…

“आपलं मूळ व्यक्तिमत्व लपवून जगाला दाखवण्यासाठी पेहराव बदलणं कितपत योग्य आहे?”

“राजकारणात या बारीकसारीक गोष्टींना खूप महत्व असतं बेटा…. लोकांच्या नजरा लगेच बदलतात..”

“बदलू देत…मी आता सामोरी जाणार ते माझ्या मूळ व्यक्तिमत्वासोबत…”

तेजु व्हाइट कुर्ता आणि जीन्स घालून पत्रकार परिषदेत जाते…सर्वांच्या नजरा तिथे खिळलेल्या असतात…tv वर लाईव्ह टेलिकास्ट चालू असते…सगळी लोकं नाईकांच्या लेकीला पाहायला उत्सुक असतात…

तेजु सर्वांसमोर बसते..

“तुम्ही काही विचारण्याआधी मी तुम्हाला काही सांगू इच्छिते… ”

तिच्या पहिल्या वाक्यानेच सर्व पत्रकार गार झाले होते, सर्वांना वाटलेलं की नवीन असल्याने कॅमेरा समोर हिची घाबरगुंडी उडेल पण तेजु मात्र अश्या आवेशात बोलत होती जणू नाईकच तिच्या तोंडून बोलत होते..

“ही आहे एक फाईल…नाईक साहेब सत्तेवर असताना रस्ता बांधणीच्या कामात जो काही घोटाळा झाला त्याचे सर्व पुरावे यात आहेत..”

सगळीकडे कुजबुज सुरू होते…

“नाईक साहेब आणि भ्रष्टाचार?? आणि खुद्द मुलगी ते सर्वांसमोर आणतेय?? काय प्रकार आहे नक्की हा??”

“शांत बसा….ए..लाव रे तो व्हिडीओ…”

स्क्रीन वर तेजु च्या घरच्या cctv फुटेज चं प्रक्षेपण सुरू होतं… आणि गोविंद ती फाईल कशी ऑफिस मध्ये चोराच्या पावलाने लपवतो हे सगळं त्यात दिसतं…

सर्वांमध्ये एकच खळबळ उडते..तिकडे पोलीस गोविंद ला चौकशी साठी घेऊन जातात…

“मॅम…तुम्ही पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभ्या आहात. तुम्हाला कसलाही अनुभव नसताना असं पाऊल तुम्ही उचललं… काय सांगाल…”

“अनुभव महत्वाचा असला तरी त्यातून शिकून योग्य ती पावलं टाकणारे फार तुरळक असतात…आणि आजवर अनुभवी राजकारण्यांनी देशाची किती प्रगती केली आहे हे तुम्ही पहिलंच असेल..”

“मॅम तुम्ही नाईकांच्या मुलगी आहात, म्हणून तुम्हाला सहजपणे या पदासाठी उमेदवार म्हणून उभं राहता आलं…हे nepotism नाही का?”

“कुणाच्या घरात जन्माला यावं हे माझ्या हातात नाही…आणि नाईकांची मुलगी असल्याने त्यांचे गुण नक्कीच माझ्यात आहेत आणि याचाच उपयोग जनतेच्या सेवेसाठी होईल..”

“मॅम तुम्ही लंडन मध्ये स्थायिक होता…तिथून अचानक इकडच्या वातावरणात आल्यावर तुम्हाला काय बदल वाटला?”

“दोघांची तुलना होऊ शकत नाही…ते त्यांच्या जागी आपण आपल्या जागी..पण तिथे पाहिलेल्या सकारात्मक गोष्टी इथे कश्या आणता येतील याचा विचार नक्कीच केला आहे…”

“मॅम शेवटचा प्रश्न…तुम्ही प्रचाराला नकार दिला…त्यामागचं कारण काय? तुम्हाला खात्री आहे का की तुम्हीच निवडून येणार म्हणून?”

तेजु तिथून उठते…तिथे लावलेल्या मोठ्या स्क्रीन जवळ जाते, त्याला पेन ड्राईव्ह लावते आणि रिमोट हातात घेते…

स्क्रीनवर सर्वांचं लक्ष जातं… कॅमेरे त्या दिशेने फिरतात..

“प्रचारात वेळ घालवण्यापेक्षा राज्यात काय काय उपक्रम राबवता येतील याची मी ब्लुप्रिंट करण्यात मग्न होते…”

तेजु एकेक प्रेझेन्टेशन देऊ लागते…

“शिक्षणव्यवस्था… शाळेतला मुलगा इतिहास घोकतो पण एखादा गड पाहिल्यावर त्याला तो ओळखता येत नाही…मॅकेनिकल इंजिनियर रस्त्यात गाडी बंद पडली की मॅकेनिक ला शोधत बसतो…प्रेशर लॉ शिकूनही सायकलची हवा भरताना त्याचीच हवा निघून जाते…याचं कारण काय??? प्रॅक्टिकल नॉलेज चा अभाव…हे बदलेल…”

“भ्रष्टाचार… कडक कायदे लागू होतील…सरकारकडून आलेल्या निधीचा पै पै चा हिशोब ठेवला जाईल…”

“नोकरी… नोकरी शोधत बसण्यापेक्षा स्वतः रोजगाराची संधी कशी निर्माण करता येईल याची ट्रेनिंग तरुणांना दिली जाईल..”

“गरिबी….राज्यात एकही गरीब दिसणार नाही याची तजविज…स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता..”

सर्वांच्या अंगावर नुसते काटे उभे राहिले…तेजु अश्या पद्धतीने सांगत होती जणू ती एका युद्धाचं प्रतिनिधित्व करत होती…कॅमेरामन कॅमेरा सोडून नुसते स्क्रीनवर पाहत राहिले आणि tv वर बघणारी जनता हातातलं सगळं सोडून tv समोर मग्न झाली…

तेजु शेवटचं वाक्य बोलते…

“हे सगळं सत्यात येणार आहे…तुमचं एक मत…राज्य बदलून टाकेन…नमस्कार…”

एवढं बोलून तेजु तिथून चटकन निघून जाते आणि टाळ्यांचा गजर कितीतरी वेळ त्या ठिकाणी घुमत राहतो…2 महिन्याचा प्रचार तेजुने अवघ्या सेकंदात आटोपला होता..

क्रमशः

धुरा (भाग 6) ©संजना इंगळे

2 thoughts on “धुरा (भाग 5) ©संजना इंगळे”

Leave a Comment