मनोरुग्ण झालीये मी…वेगवेगळी व्यसनं करून, जीवनाचं, आरोग्याचं गणितच चुकलं सगळं..लग्न मोडलं तेव्हा वाटायचं मी स्वतंत्र झाले, सुखी झाले..घरी यायची…आवडेल ते करायची, खायला बनवायचे, tv पहायचे, जॉब करायचे, भरपूर पैसा कमवायचे आणि उडवायचे..पण हळूहळू हे नको वाटू लागलं..वाटायचं बंधन टाकणारं कुणीतरी हवं..घरी येईल तेव्हा वाट बघणारं कुणीतरी हवं, सकाळी उठल्यावर डोक्यासमोर आपली माणसं दिसावीत..पण सगळी दूर गेली होती..नवऱ्याशी जुळवून घेता आलं असतं, थोड्याफार ऍडजस्टमेंट करता आल्या असत्या हे आता समजतंय.. डोकं बधिर झालंय माझं..वय झालं ना..आपणच ट्रीटमेंट घ्यावी..वाटलं तर भाडोत्री माणसं मिळतात इथे काळजी करायला…”
नर्मदा सुन्न झाली हे ऐकून,
काही क्षण शांतता पसरली,
“माझं सोड, तू सांग नर्मदे, तुझं कसं चाललंय?”
नर्मदेला वाटे आपण कसं सांगावं,
“अगं बोल की..”
“काही नाही, आताच दोन्ही नातवंडांना शाळेत सोडलं..आता घरी आले, सुनबाई स्वयंपाक करतेय..मुलगा ऑफिसमध्ये गेलाय. आमचे हे बाहेर झाडांना पाणी घालताय..मी आता जेवण करून थोडावेळ पडेन, संध्याकाळी मुलगा आला की जायचं आहे जवळच्या मंदिरात..”
“म्हणजे…तुझं सुरवातीपासून नवऱ्याशी पटलं?”
“पटवून घेणं भाग होतं, आमच्याकडे लग्न म्हणजे पवित्र बंधन..सहजासहजी सोडता येत नाही..”
“आणि तुझी मुलं, नातवंडं तुझ्याकडेच? तुझ्याजवळ?”
“हो, अजून कुठे जाणार? मुलांना आजी आजोबांची माया मिळायला हवी ना, आणि सुनबाईने स्पष्ट सांगितलं आहे की मी माझ्या सासू सासऱ्यांना कुठेही जाऊ देणार नाही…”
हे सगळं जेनिफरला पचायला जडच जात होतं,
दोघींचं बोलणं झालं,
दुसऱ्या दिवशी नर्मदेच्या माहेराहून फोन आला,
“ताई, अगं तू तुझी बालपणीची मैत्रीण नाही का, तिने सुसाईड केलं म्हणे..”
नर्मदेच्या हातातून फोन गळून पडला..
“आज सर्वांशी बोलायचं आहे असं ती का म्हटलेली ते समजलं..”
तिच्या घरात एक चिठ्ठी सापडलेली,
“पुढील जन्म मला नर्मदेच्या देशातच मिळू दे..”
*******
धर्म आणि संस्कृती,
माणसाला बंधनात ठेवत नाहीत,
तर अविचारापासून दूर ठेवतात,
आणि काही बंधनं रास्तच असतात,
हे आयुष्याचा संध्याकाळी समजतं…
Difference between two cultures. Absolute freedom and liberty in life gives you choice but not happiness. A Super Senior citizen.
कथा छानच आहे.परदेशी आणि मायदेशी संस्कृतीमध्ये धरंबंधन शिर्षक गोंधळात पाडते.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.