धर्मबंधन-2

अशातच तिचं लग्न ठरवलं गेलं,

मुलगा वडिलांनीच पसंत केला, नर्मदाला तयार राहायला सांगितलं, तिचं मत विचारणं दूरच..

जेनिफरला विशेष वाटलं,

“तुला न विचारता इतक्या लहान वयात तुझं लग्न? आमच्याकडे मी जो मुलगा शोधेल त्याच्याशीच लग्न केलं जाईल”

नर्मदेला रडू आलं,

किती तफावत,

पण बंड करायची ताकद नव्हती, धाक प्रचंड, वडिलांचा निर्णय अंतिम..

तिचं लग्न झालं,

नर्मदा सासरी गेली, जेनिफरसोबत असलेला संवाद संपला,

अधूनमधून माहेरी गेली की तिच्याशी पत्रव्यवहार होत असे,

नर्मदा मोठी होत होती, सासरी रुळत होती,

नर्मदेला दोन मुलं झाली, जेनिफर तेव्हा नुकतीच लग्नबंधनात अडकली होती असं समजलं,

कालांतराने तिचा घटस्फोट झाला असंही समजलं,

इकडे नर्मदा सासरच्या जाचाखाली दबत होती आणि तिकडे जेनिफर नाही पटलं म्हणून नवऱ्याला सोडून आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगत होती,

नर्मदेला ती सोय नव्हती,

खूप वाटायचं, सगळं सोडून द्यावं, माहेरी जावं..

पण तसं केलं तर ना माहेरी जागा मिळणार ना सासरी,

गपगुमान सोसत राहिली..

हळूहळू परिस्थिती बदलली,

नर्मदेची किंमत कळू लागली, घरात तिच्याशिवाय पान हलत नसे,

आता नवरा आणि सासूही तिचं कौतुक करायचे, तिच्या मताला किंमत द्यायचे,

या काळात जेनिफरशी संपर्क पूर्ण तुटला..

आयुष्याच्या उतारवयात नर्मदा विचार करू लागली,

आयुष्य गेलं, काही गोष्टी मिळवल्या, काही सोसल्या, काही सोडाव्या लागल्या,

स्वातंत्र्य तेवढं उशिरा मिळालं,

पुढील जन्मी जेनिफरच्या देशातच जन्मू दे, ती म्हणू लागली..

पुढे नातवंड झाले,

नर्मदेच्या जीवनात आनंदी आनंद पसरला,

नातवंडात ती रमली,

दुसरा कसलाही विचार करायला वेळ मिळेना,

नातवंडांना सांभाळताना तिचा नवरा आणि ती त्यांच्या मुलांच्या आठवणी काढत,

संसार कसा केला, संकटांवर कशी मात केली यावर चर्चा करत सुखी संसाराच्या यशाकडे कौतुकाने बघत,

यात जेनिफरचा विसरच पडलेला,

पण एके दिवशी अचानक फोन वाजला,

तिकडून जेनिफर बोलत होती,

नर्मदेला भरून आलं, खूप दिवसांनी तिचा आवाज ऐकलेला..

“कशी आहेस जेनिफर? किती दिवसांनी बोलतोय आपण.”

“आज मला सगळ्यांशी बोलायचं आहे”

“म्हणजे?”

“काही नाही, आठवण आलेली तुझी सहज..”

“काय मग, कसं चाललंय तुझं..दुसरं लग्न केलंस की नाही?”

“दुसरं लग्न मोडून कित्येक वर्षं गेली..पहिल्या नवऱ्यापासून 2 मुलं आणि दुसऱ्या नवऱ्यापासून 3..”

नर्मदा अवाक झाली, काय बोलावं कळेना..

“माझ्या मर्जीनुसार आयुष्य जगले, वाटलं तेव्हा नवऱ्यासोबत राहिले..वाटलं तेव्हा सोडून दिलं..पण मुलांची वाताहत झाली हे खरं..”

“कशी आहेत मुलं?”

“माझ्याकडे नाहीत..”

“म्हणजे?”

“म्हणजे, माहीत नाही कुठे आहेत..माझ्याशी संबंध नाही ठेवला त्यांनी..लहान मुलगा आहे संपर्कात. पण तेही त्याला संपत्तीचा वाटा हवाय म्हणून कोर्टकचेरी चालू आहे..”

“तू बरी आहेस ना?”

“10 वर्षांपासून ट्रीटमेंट सुरू आहे..”

“कसली?”

भाग 3

धसर्मबंधन-3

2 thoughts on “धर्मबंधन-2”

Leave a Comment