देवपण-1

 “आजोबा, बाळाकाका त्या काकांचे पाय का पडताय? ते तर त्यांच्यापेक्षा मोठे आहेत ना?”

निरागस मनूला हा प्रश्न पडला,

आजवर केवळ मोठ्या व्यक्तींचे पाय पडायचे असतात हे तिला माहीत होतं,

पण शेजारच्या काकांचे आबालवृद्ध सगळेच पाया पडत होते,

शेजारी आक्रोश सुरू होता, गंभीर वातावरण, त्याची बायको तोंडावर मारून घेत होती, मुलं घाबरलेल्या अवस्थेत शेजारी बसून होते..

राजूकाका..

मनूच्या शेजारी राहणारे कुटुंब..

आज हॉस्पिटलमधून त्याचं पार्थिव घरी आणलं होतं,

थोड्याच वेळात त्याचा अंत्यविधी होणार होता,

मनुचे आई वडील तिथे उपस्थित होते,

पण हे सगळं मनूला दिसू नये अन ती घाबरू नये म्हणून आजोबा तिला लांब घेऊन जात होते पण तिच्या नजरेस हे पडलंच..

राजूकाका, एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व..

सतत दारू पिऊन येणार,

भाग 2

https://www.irablogging.in/2022/12/2_14.html

भाग 3

https://www.irablogging.in/2022/12/3_14.html?m=1

1 thought on “देवपण-1”

Leave a Comment