देवदूत -2

किमान मिहीर आहे तोवर तिला घरापासून दूर करायचं असं तिच्या माहेरचा निर्णय. दुसऱ्यांदा वैधव्य आलं तरी त्यांना फिकीर नव्हती, त्यांना फक्त ओझं कमी करायचं होतं..

ती दगड बनली, घरचे म्हणतील ते करायला लागली..अगदी शुष्क..

ना भावना उरलेल्या, ना कसलं मन…

लग्न झालं, तो खोलीत आला. अंकुर शांत झोपी गेलेला.

ती धास्तावली..

स्वतःला समर्पित करायची तिला इच्छाही नव्हती आणि गरजही नव्हती..

तो आला, समोर बसला..

“हे माझं घर..इकडे ही खोली, तिकडे ती खोली. आज फक्त भात खाल्ला, तेवढ्यावर होतं माझं. डबा नको मला, कामाच्या ठिकाणी जेवतो मी. माझ्या डायरीत एक पेन आहे, मित्राने दिलेला..निळ्या रंगाचा. निळ्या रंगाचे काही शर्ट पण आहेत माझ्याकडे..”

तो काहीबाही बरळू लागला..

हा वेडसर तर नाही?

तिच्या मनात शंका येऊ लागली..

बोलून झालं आणि तो बाहेरच्या खोलीत झोपायला गेला..

तिने सुस्कारा टाकला.

हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं…

हा वेडसर नाही,

गेले कित्येक महिने हा एकटाच होता घरात. ना बोलायला कुणी ना विचारपूस करणारं कुणी.

आज कित्येक दिवसांनी त्याला हक्काचा माणूस भेटला, फक्त ऐकून घ्यायला..

इतके दिवस मनात साठवलेलं सगळं तो बाहेर काढत होता..

त्याला प्रतिक्रिया नको होती, फक्त कान हवा होता…त्याचं ऐकून घ्यायला…

तिला त्याची दया आली. विचार करत करतच ती झोपी गेली.

***

भाग 3

देवदूत -3 अंतिम

6 thoughts on “देवदूत -2”

  1. Khup Chan story hoti👌👌👌👌👌
    Evdhi sunder k ashru alet😊
    Asach lihit Raha👍
    All the best dear..
    Take Care
    Bye🙋

    Reply

Leave a Comment