भाग 1
https://www.irablogging.in/2021/04/1.html?m=1
भाग 2
https://www.irablogging.in/2021/04/2.html?m=1
भाग 3
https://www.irablogging.in/2021/04/3.html
भाग 4
https://www.irablogging.in/2021/04/4.html?m=1
भाग 5
https://www.irablogging.in/2021/04/5.html
भाग 6
https://www.irablogging.in/2021/04/6.html
भाग 7
https://www.irablogging.in/2021/04/7.html
भाग 8
https://www.irablogging.in/2021/04/8.html
भाग 9
https://www.irablogging.in/2021/04/9.html
भाग 10
https://www.irablogging.in/2021/04/10.html
भाग 11
https://www.irablogging.in/2021/04/11.html
भाग 12
https://www.irablogging.in/2021/04/12.html
भाग 13
https://www.irablogging.in/2021/04/13.html
भाग 14
https://www.irablogging.in/2021/04/14.html
भाग 15
https://www.irablogging.in/2021/05/15.html
भाग 16
https://www.irablogging.in/2021/05/16.html
भाग 17
https://www.irablogging.in/2021/05/17.html
भाग 18
https://www.irablogging.in/2021/05/18.html
भाग 19
https://www.irablogging.in/2021/05/19.html
भाग 20
https://www.irablogging.in/2021/05/20.html
भाग 21
https://www.irablogging.in/2021/05/21.html
भाग 22
https://www.irablogging.in/2021/05/22.html
भाग 23
https://www.irablogging.in/2021/05/23.html
भाग 24
https://www.irablogging.in/2021/06/24.html
भाग 25
https://www.irablogging.in/2021/06/25.html
कोमल सोबत इतकं सगळं होऊन गेलेलं असतांना सूरजचं चित्त ठिकाणावर नसतं, कधी एकदा जाऊन कोमलला भेटतो असं त्याला झालं. समिक्षा, तिचे आई वडील आणि देसाई सर्वांचा निरोप घेतात. समिक्षाचे आई वडील परेशच्या आई वडिलांना रितसर आमंत्रण देतात. सगळी मंडळी परत गेल्यानंतर सूरज कोमलकडे जायला निघतो. परेश शेताकडे लक्ष देण्यासाठी तिथेच थांबतो.
कोमलच्या घरी पोचताच कोमलचे वडील सुरजला बघून त्याला कोमलच्या खोलीत जायला लावतात, कोमल अजूनही आजारी असते, तिला दिलेल्या। इंजेक्शन मुळे तिला खूप अशक्तपणा आलेला असतो. सुरजला बघताच ती उठायचा प्रयत्न करते..
सूरज तिच्याजवळ येतो आणि तिला मिठी मारतो, दोघेही एकमेकांच्या मिठीत कितीतरी वेळ रडत असतात.
“कोमल, हे इतकं सगळं होऊन गेलं आणि मला माहीतही नाही..किती त्रास झाला असेल तुला..”
“त्या अभिनवने मला जीवे मारलं असतं, वेळेवर समिक्षा मुळे वाचले मी..”
“आता तुला एकटं सोडणार नाही मी, कधीच नाही…लवकरात लवकर आपण लग्न करूया..”
सूरज लागलीच तिच्या घरच्यांशी बोलतो, मुहूर्त वगैरे न बघता पंधरा दिवसातच लग्न उरकायचं ठरतं. साध्या पद्धतीने लग्न आटोपायचं ठरतं. या काळात पेरणी झालेली असल्याने शेतात जास्त काम नसणार होतं. तारीख ठरते, सूरज परेशला फोन लावतो..
“पऱ्या…12 तारखेला लग्न आहे बरं का..”
“अरेवा, तुला कसं कळलं?”
“कसं कळलं म्हणजे? आम्हीच ठरवली तारीख..”
“अरे 12 ला तर माझी तारीख फिक्स केलीये..”
“काय??”
“म्हणजे दोघांचं लग्न एकाच दिवशी?”
“पऱ्या..हे बघ माझ्या लग्नात माझ्यासोबत तू पाहिजेस, तुला माहितीच आहे की मी किती धांदरट आहे ते…आणि त्या दिवशी जर तू माझ्या सोबत नसलास तर…माझं काय होईल यार..”
“बरं थांब, आपण लग्न एकाच मांडवात करू, म्हणजे दोन्ही नवरदेव सोबत असतील, चालेल?”
“अरे पण शेवटी तुही नवरदेवच ना…तुला कशाला वेळ मिळेल माझं आवरायला?”
“सुऱ्या आता तरी मोठा हो, लग्नाच्या दिवशी काय रे आवरून द्यायचं तुझं? हे बघ लग्न न तुला पुढे ढकलता येणार ना मला, पण एका मांडवात लग्न करणं शक्य आहे तेवढं करूया..”
“आता काही पर्यायच नाही..”
दोघांच्या घरच्यांनी बोलणी करून अखेर एकच हॉल बुक केला आणि दोघांची लग्न एकाच वेळी लावून देण्याचं ठरलं. परेश खुश होता, त्याला त्याचं प्रेम मिळालं होतं..आणि दुसरीकडे कोमल आणि सुरजलाही आता एकमेकांपासून जास्त दिवस दूर राहणं शक्य नव्हतं. घरच्यांनी पटापट सगळी तयारी केली. खरेदी साठी परेश आणि सूरज एकत्र होते आणि दुसरीकडे कोमल आणि समिक्षा त्यांची खरेदी करण्यासाठी गेलेले. सूरज एकेक सूट बाजूला काढत होता, निळा घेऊ की चॉकलेटी? डार्क कलर घेऊ की फिका? त्याचं काही एकमत ठरत नव्हतं..परेशने मात्र सुरजने बाजूला काढलेल्या सूट मधून एक निवडला, कारण सूरज ने ते सूट निवडलेले असल्याने चांगलेच असणार हे परेशला माहीत होत. परेशने त्यातला एक उचलला आणि पॅक करायला सांगितला. सुरजने अखेर एक डार्क चॉकलेटी कलर चा सूट घेतला आणि तोही काउंटर वर आला.
“सुऱ्या झालं मग एकदाचं फायनल?”
“हो बाबा..तू कोणता घेतला?”
“तू आवडलेले सूट बाजूला काढून ठेवत होतास ना त्यातूनच घेतला एक..”
“अच्छा..पण ते आवडले म्हणून बाजूला काढून ठेवले नव्हते..”
“मग?”
“ते अंगावर एकदम बकवास दिसतील म्हणून बाजूला करून ठेवलेले..”
परेश बघतच राहिला..काय करावं या सुरजला..
खरेदी करून सर्वजण घरी आले..परेश आणि सूरज आपापले सूट घालून बघत होते, “पऱ्या कसा दिसतोय मी?”
“झक्कास, आणि मी?”
परेशचा सूट जास्त चमकत होता, सूरजला वाटायला लागलं की मी हाच सूट का नाही घेतला? सूरज परेशकडे मागून पुढून बघत राहिला आणि हळूच त्याला म्हणाला..
“पऱ्या…”
“घे..हा सूट घे..तूच घाल..आणि तुझा सूट मार माझ्या माथी..”
“पऱ्या…तूच रे तूच..”
सूरज किती नखरेबाज आहे हे परेशला चांगलंच माहीत होतं. एकेक करून लग्नाची सगळी खरेदी झाली. अखेर लग्नाचा दिवस उजाडला, सुरजने परेशला पऱ्या पऱ्या करून हैराण करून सोडलेलं, परेशला सतत विसर पडायचा की आपलंही लग्न आहे म्हणून. स्टेजवर दोघांचीही सोय केली गेली, नवरदेव नवरीला बोलवा असा आदेश भटजींनी सोडला..सूरज आणि कोमल जागेवर आले, समीक्षा सुद्धा आली पण परेश? तो तर गायबच..बराच वेळ होऊनही परेश आला नव्हता, समिक्षाच्या आई वडिलांची हुरहूर वाढली, एक तर आधीच्या अनुभवावरून त्यांच्या मनात पोकळी निर्माण झालेलीच होती. सर्वजण सूरज कडे बघू लागले, सूरज प्रत्येकाची नजर चुकवत होता..
काही वेळाने परेश धावत धावत आला आणि सुरजच्या हातात त्याचा आवडता गॉगल देत त्याच्या जागेवर येऊन उभा राहिला. सर्वजण रागाने सुरजकडे बघू लागले, पण तो मात्र गॉगल चढवून फोटोग्राफर ला पोज देत बसला. लग्नाच्या दिवशी सुद्धा सुरजने परेशला सोडलं नाही.
लग्न आनंदात पार पडलं, समिक्षा परेशच्या घरी गेली आणि छानसा गृहप्रवेश तिचा झाला. इकडे सुरजच्या घरी सुद्धा जय्यत तयारी झालेली, पण जसजसा गृहप्रवेश चा कार्यक्रम होत होता तसतसा सुरजचा चेहरा काहीतरी वेगळंच सांगून जात होता. एक अनामिक हुरहुर त्याच्या चेहऱ्यावर दाटून आलेली. इतका वेळ आनंदात असणारा सूरज आता मात्र जरा निराश झाला होता. कोमलच्या नजरेतून ते सुटलं नाही, पण आजूबाजूला इतके नातेवाईक आणि घरची माणसं असतांना तिला काही ते विचारणं शक्य झालं नाही..सर्व कार्यक्रम पार पडताच सुरजची मावशी कोमल आणि तिच्यासोबत करवली आलेल्या बहिणींना सांगते..
“तुमची सोय वरच्या खोलीत केलेली आहे, जा सर्वांनी फ्रेश व्हा…”
सूरज मावशीला अडवतो.. सर्वजण सुरजकडे बघतात..
“मावशी, इथवर सगळं ठीक आहे पण कोमलला तिच्या माहेरी जावं लागेल..”
तो हे बोलताच सर्वांना धक्काच बसला..
“तुम्हाला माहीत नसेल पण आमच्यात एक करार झाला होता, लग्न झाल्यानंतर पाच वर्षांनी आम्ही एकत्र येणार.. त्या आधी कोमल तिच्या आई वडिलांकडेच राहणार..कारण काय ते विचारू नका, कोमलने काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे आणि मी त्याला साथ द्यायची ठरवली आहे..”
सर्वजण हे ऐकून थक्क होतात, पाच वर्षांच्या प्रकरणाचा सर्वांना तर अगदी विसरच पडलेला.. पण सुरजच्या ते लक्षात होतं. त्याने कोमलची बॅग उचलली आणि तिला धरून तो गाडीकडे नेऊ लागला..
दरवाजाजवळ येताच कोमलचे पाय थबकले, तिने पटकन बॅग मधून कराराचे पेपर्स काढले आणि टराटर फाडून टाकले. सूरज बघतच राहिला..कोमल म्हणाली,
“अरे वेड्या, तुझ्यापासून काही क्षण दूर होते तरी माझ्या जीवात जीव नव्हता, आणि आता पाच वर्षे दूर राहायचं म्हणतोस? माझ्या आई वडिलांसाठी मला जे करायचं आहे ते केवळ अन केवळ तुझ्या सोबतीने शक्य होईल, त्यासाठी तुझ्यापासून दूर जायची गरज नाही मला..विसर तो करार, नाही राहू शकत आता तुझ्याशिवाय..”
“अरेच्या, हे असलं काही ठरलं नव्हतं, मी हनिमून चं काही प्लॅनिंग केलंच नाही..”
“कशाला हवंय प्लॅंनिंग? आपण हनिमून ला गावी जाऊ, तुझ्या शेतीचा प्रोजेक्ट पूर्ण करायला, माझीही मदत होईल आता..”
दोघेही आनंदून गेले, सुरजच्या मनावरचं मोठं ओझं दूर झालं. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा झाली. तिकडे परेश आणि समिक्षाचीही पहिली रात्र होती..समिक्षा आणि परेश ची नजरानजर होत नाही तोच एक फोन वाजतो, बोलणं होतं आणि परेश समिक्षा ला म्हणतो,
“मी आलोच अगदी 15 मिनिटात..”
“कुठे चाललास?”
“साल्याला… तुझ्या भावाला धीर द्यायला..”
समाप्त
खूपच सुंदर
Mast hoti katha