तडजोड

आज पुन्हा त्याने घरी फोन केला आणि आईचं नेहमीचं रडगाणं सुरू झालं..हे दुखणं, ते दुखणं….बाबा आजारी..
खरं तर संदेश ला आई बाबांनी शिक्षणात कुठलीही कसर ठेवली नव्हती. त्याने खूप मोठं व्हावं अशी सामान्य अपेक्षा त्यांची होती. भरपूर शिकवून मुलाला त्याच्या पायावर उभं केलं, पण छोट्या शहरात संधी नाहीत म्हणून मोठ्या शहरात अर्ज केला आणि संदेश एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठया हुद्द्यावर रुजू झाला..आई वडिलांनी हसत त्याला निरोप दिला.
संदेश बाहेरगावी असला तरी आई वडिलांना नियमित फोन, महिन्यातून एखादा चक्कर त्याचा होत असायचा.
एका वर्षात त्याचं लग्न झालं आणि बायकोला घेऊन तो परत आपल्या शहरात गेला.
“आमचं पोरगं…इतक्या लाडाकोडाने वाढवला.. अमेरिकेत गेला तो विसरलाच आम्हाला…आता या वयात आम्ही कुणाकडे पाहायचं…”
बाबांचे एक मित्र त्यांच्याकडे मन मोकळं करत होते तसे आई बाबांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली..
“आपलाही मुलगा असा निघाला तर? त्याला तर आता बायको आहे..त्याचा संसार आहे…तो आम्हाला विसरला तर?”
नाहक विचार मनात आणून आई बाबा रोज काळजीत पडत. खरं तर लग्न झालं तरी संदेश आई बाबांची काळजी घ्यायला कुठेही कमी पडत नसायचा…पण आई बाबांचं त्यावर समाधान होत नसे.
एक दिवस संदेश ला प्रमोशन मिळण्याचं जाहीर झालं..या आठवड्यात केव्हाही ते मिळणार होतं..मोठमोठी लोकं ज्या पदासाठी जीव काढतात ते संदेश ला खूप लहान वयात मिळणार होतं…संदेश ला आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं….कंपनीत याच संदर्भातील मिटिंग चालू असताना बायकोचा फोन आला, त्याने कट केला…नंतर आईचा फोन पाहून कट करणं त्याला योग्य वाटलं नाही..त्याने पटकन फोन उचलत “आई मी करतो थोड्या वेळात…” असं म्हणत फोन ठेवला आणि आईच्या धारा सुरू झाल्या..बाबांच्या मित्राचं उदाहरण इतक्यात जरा जास्तच डोक्यात वळवळ करायला लागलं होतं..
“लग्नानंतर मुलं बदलतात हेच खरं… मुलांना एवढं वाढवलं…लहानाचं मोठं केलं..”
आणि नेहमीची टेप सुरू…
संदेश मिटिंग सम्पवून आईला फोन करतो..
“आई कामात होतो, बोल काय म्हणतेस?”
“काही बोलू नको…इथे आम्हाला वाऱ्यावर सोडून संसार करत बसलाय तिकडे मजेत…माझं दुखणं वाढलंय… बाबा आजारी असतात…कोण बघणार आमचं…मला उठताही येत नाहीये..आणि बाबा कालपासून खोकताय..”
संदेश ला कळेनासं झालं..इतके दिवस अभिमानाने मुलाबद्दल सांगत असायचे..आणि आता माझा बाहेर असण्याने यांना एवढा का त्रास व्हायला लागलाय?
आई वडिलांनी मोठ्या कष्टाने आपल्याला शिकवलं, मोठं केलं…त्यांच्या कष्टाची जाण संदेश ला होती…आणि त्यांना विसरायचा प्रश्नच नव्हता…संदेश ची बायकोही सासू सासऱ्यांना जीव लावायची..
संदेश न कळवता आपल्या घरी पोचतो…आई बाबांना सरप्राईज म्हणून…
संदेश प्रमोशन ची मिटिंग कॅन्सल करत बायकोला घेऊन घरी जातो…गेल्यावर दिसतं..आई बाबा अगदी ठणठणीत असतात…आई मोठ्या उत्साहाने कामं करत असते…बाबा एका माणसाशी खणखणीत आवाजात बोलत असतात..
संदेश ला पाहून ती जरा घाबरतात..
“सांगायचं तरी येणार आहात म्हणून..”
आई बाबांची वागणूक जरा वेगळी वाटली…
संदेश फार मोठ्या पेचात सापडला…गावी परतलो तर भविष्य अंधारात असेल…आणि नाही गेलो तर आई बाबा कायम कुढत जगत राहतील….
संदेश ने जाहीर केलं..
“आई बाबा…आता माझी जबाबदारी आहे तुमची सेवा करण्याची…तुम्ही मला इतकं शिकवलं.. मोठं केलं..पण इथे राहिलो ते ते शिक्षण सगळं वाया जाईल…तुमच्या कष्टाचा तो अपमान होईल…म्हणूनच आम्ही ठरवलं, की तुम्हाला आमच्यासोबत न्यायचं…वसुधा नोकरी सोडतेय, तुमच्यासाठी…”
“हो आई बाबा..नोकरीपेक्षा तुम्ही महत्वाचे आहात मला…एक जण नोकरी करतोय तेवढं पुरे…”
या शब्दांनी आई बाबांना भरून आलं..आपण उगाच दुसऱ्यांचा मुलासोबत आपल्या मुलाची तुलना करायचो… सगळी मुलं सारखी नसतात..
आणि आमच्यासोबत या म्हटलं तर आई बाबांना ते घर, ते शेजारी, गावातले नातेवाईक सोडणं अशक्य होतं…
“नाही बाळ…आम्हाला हे गाव सोडणं शक्य नाही..”
“आई बाबा…सर्वांनी थोडी तडजोड केली तरच सगळं सुरळीत चालेल ना?”
“काळजी नको…हे बघ..मी आणि बाबा अगदी ठणठणीत आहोत…आणि गरज पडलीच तर शेजारी आणि नातेवाईक आहेच की हाकेच्या अंतरावर…आम्हाला बळजबरी करू नकोस…आम्ही खरंच खुष आहोत इथे…”
मुलाकडे जायच्या भीतीने आई बाबा घाबरले होते…कारण तो तडजोड त्यांना नको होती…आणि आपल्याला एवढीशी तडजोड मान्य नसताना मुलाला त्याच्या भविष्याशी तडजोड करायला लावणं किती चुकीचं होतं हे त्यांचा लक्षात आलं..

आपल्याही आजूबाजूला आहेत असे संदेश..जे या पेचात अडकले आहेत आणि त्यांचं आयुष्य गुंतागुंतीचं बनलं आहे…

136 thoughts on “तडजोड”

  1. ¡Saludos, apostadores apasionados !
    Casino online extranjero con juegos populares – п»їhttps://casinosextranjerosenespana.es/ casino online extranjero
    ¡Que vivas increíbles recompensas sorprendentes !

    Reply
  2. ¡Bienvenidos, apostadores dedicados !
    Casino fuera de EspaГ±a con mГ©todos internacionales – п»їhttps://casinoporfuera.guru/ casinos online fuera de espaГ±a
    ¡Que disfrutes de maravillosas premios asombrosos !

    Reply
  3. ¡Saludos, participantes del entretenimiento !
    casinosonlinefueraespanol sin restricciones fiscales – п»їhttps://casinosonlinefueraespanol.xyz/ casinosonlinefueraespanol
    ¡Que disfrutes de recompensas asombrosas !

    Reply
  4. ¡Hola, amantes del ocio y la emoción !
    casinosextranjerosdeespana.es – apuestas personalizadas – п»їhttps://casinosextranjerosdeespana.es/ п»їcasinos online extranjeros
    ¡Que vivas increíbles jugadas espectaculares !

    Reply

Leave a Comment