“माझा पार्टनर आहेस…सर्व गोष्टीत आपले समान शेअर्स आहेत…आणि त्याची लीगल प्रोसेस लग्नात झालेली आहे..”
सोहम कपाळावर हात मारून घेतो..
श्वेता ला त्याची अवस्था समजते, आणि ती म्हणते..
“आपण दोघेही variables आहोत..पण dependent variables… एकमेकांवर आपण depend आहोत… तूला काही झालं तर त्रास मला होतो… तू नाराज असला तर माझ्या मनाला रुखरुख लागते…आणि माझ्यावर काही संकट आलं तर तू माझी ढाल बनून सामोरा जातोस… variable असलो तरी एकमेकांशी एकरुप आहोत आपण…एका variable मध्ये बदल झाला की दुसऱ्याला झळ लागते…”
सोहम आ वासून बघत होता…टेक्निकल भाषेत का असेना, श्वेता रोमँटिक बोलत होती..
“मी तुझा computer तर तू माझा cpu… मी तुझा कीबोर्ड आणि तू माझा…”
“बोल बोल…मी तुझा?”
“उंदीर…”
“Mouse???”
श्वेता हसायला लागते, दोघांची चांगलीच पिलो फाईट होते…आणि टेक्निकल प्रेमही चांगलंच बहरायला लागतं…
सोहम आ वासून बघत होता…टेक्निकल भाषेत का असेना, श्वेता रोमँटिक बोलत होती..
संध्याकाळी दोघांनाही पार्टी ला जायचं असतं… एका मोठ्या कंपनीच्या मालकाची पार्टी होती…दोघेही तयार होऊन निघाले…एका मोठ्या हॉटेल शेजारी गाडी लावली…श्वेता ला एक फोन आला…तिने सोहम ला पुढे जायचा इशारा केला…
सोहम जात असताना त्याला त्याचा एक मित्र भेटला.
“काय मग…कसा चाललाय संसार..”
“संसार? एकदम मजेत…टेक्निकली…हा हा..”
“म्हणजे?”
“सोड तुला नाही कळणार..”
“बरं नको सांगू…पण एक लक्षात ठेव…बायकोला कधीही आपल्या वरचढ होऊ देऊ नकोस…अरे घर सांभाळणाऱ्या स्त्री चा शिक्षित स्त्री पेक्षा नक्कीच जास्त उपयोग असतो..शिकलेली मुलगी फक्त तिचा स्वतःचा विचार करते….”
बोलता बोलता दोघेही गेटपाशी जातात..
“थांबा…तुम्हाला जाता येणार नाही…”
“का?”
“Invitation कार्ड आणलंय का सोबत?”
“नाही…”
“मग त्याशिवाय आत जाता येणार नाही..”
“अहो असं कसं..”
“हे बघा, ही खूप मोठ्या कंपनीची पार्टी आहे…”
दोघांत बराच वाद होतो..
शेवटी सोहम चा मित्र म्हणतो,
“जाऊदे, असा अपमान होत असेल तर नकोच ती पार्टी..”
इतक्यात मागून श्वेता येते…
“काय झालं? Any problem??”
श्वेता ला पाहताच गेटवरचा माणूस उभा राहतो, अदबीने नमस्कार करतो…
“आपण कार्ड आणलं नाही, so आपल्याला आत सोडणार नाही..” सोहम म्हणाला…
“माफ करा साहेब..मला माहित नव्हतं तुम्ही मॅडम सोबत आहात ते…खरंच माफी मागतो मी…मॅडम चं या कंपनीत सारखं उठणं बसणं असायचं…फार मान होता मॅडम ला इथे…माझ्यापासून सर्वजण त्यांना ओळखतात…तुम्ही जा आत..”
सोहम च्या मित्राला चांगलीच चपराक मिळाली…सोहम त्याला हळूच म्हणाला…
“स्त्री शिक्षित असो वा गृहिणी…तिचं कर्तृत्व पेलण्याचा पुरुषार्थ आपण दाखवला तरच स्वतःला पुरुष म्हणून घेणं योग्य असेल…”
श्वेता ने ते गपचूप ऐकलं..आणि ती सोहम च्या अजूनच प्रेमात पडली…आपल्या स्वभावाला समजून घेणारा, आपल्या हुषारीचा आदर करणारा आणि जीवापाड जपणारा सोहम आज तिला नव्याने उमगला होता…
दोघेही घरी येतात..फ्रेश होतात…श्वेता आपल्या खोलीत जाते..तिला सासूबाईंच्या खोलीतून हुंडक्यांचा आवाज येतो…ती तडक खोलीत जाते…
सासूबाई रडत असतात..
“आई? काय झालं??”
“प्रेरणा चा फोन आला होता..”
“मग?? सगळं ठीक आहे ना??”
“रडत होती ती…तिला सासरी फार त्रास देताय गं… सासर सोडून माहेरी यायचं म्हणतेय…”
प्रेरणा श्वेता ची नणंद…सासरी जाऊन वर्ष झालेलं… पण कुरबुर सुरू असायची…प्रेरणा तशी बोलायला खमकी होती…तिचा स्वभाव श्वेता ला माहीत होता…
श्वेता काही वेळ विचार करते आणि म्हणते..
“आई…प्रेरणा ला फोन लावा आणि माझ्याकडे द्या..”
श्वेता ज्या आत्मविश्वासाने सांगत होती, सासूबाईंना समजलं की श्वेता कडे याचं सोल्युशन नक्की असणार..टेक्निकल भाषेतलं…
सासरी भांडण करून माहेरी फोनवर तपशील देणाऱ्या प्रेरणाचा स्वभाब श्वेता ला चांगलाच माहीत होता. प्रेरणा चं मन कितीही साफ असलं तरी बोलण्याने ती सगळं घालवून देत असे.
सासूबाईंनी प्रेरणा ला परत फोन केला..
“वाहिनि काय सांगतेय ऐक..”
‘वहिनी’ शब्द कानावर येताच श्वेता च्या जाणिवा जागृत झाल्या… एका मोठ्या जबाबदारी ची जाणीव झाली…तिने फोन घेतला आणि प्रेरणा ला समजावलं..
“हे बघ…तू मी सांगितलेल्या काही ट्रिक्स वापर, बघ फरक पडतोय का ते..”
“म्हणजे नेमकं काय करू?”
“म्हणजे बघ…आधी मशीन लेव्हल लँग्वेज वापर…ते जसं 0 आणि 1 मधेच इन्स्ट्रक्शन देतं तसं तू सासरी फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्ये उत्तरं दे…बाकी काहीही बोलू नकोस…त्याने फरक पडला नाही तर असेम्बली लेव्हल लँग्वेज वापर..ज्यात फक्त मोजके शब्द वापरायचे…आणि तरीही फरक पडला नाही तर higher लेव्हल लँग्वेज चा वापर कर…”
“आईकडे फोन दे..” प्रेरणा म्हणाली…
“आई अगं वहिनी काय बोलतेय हे??”
“वहिनी आहे तुझी, तुझ्या चांगल्याचंच सांगेल.तिने जेवढं सांगितलं तेवढं ऐक…”
श्वेता ला गहिवरून आलं..तिला आता नाती समजू लागली होती…ऑफिस मध्ये सिनियर्स चं ऐकायचं ते फक्त फायद्यासाठी… पण घर नावाच्या ऑफिस मध्ये..कुठलाही फायदा न बघता, कसलीही अपेक्षा न ठेवता एकमेकांचा आदर करत नाती कशी जपली जातात हे श्वेता शिकली…
सासूबाईंनी श्वेता ला खूप मोठा मान दिला होता..आणि या मानासोबतच श्वेता ला आपली जबाबदारीही वाढली आहे याची जाणीव झाली..
संध्याकाळी सोहम आल्यावर श्वेता त्याला काय हवं नको विचारू लागली…घरात कुणाला काय हवं ते ती पाहू लागली…घरासाठी खूप काही करू लागली…एका कृत्रिम स्वभावाच्या मुलीचं परिवर्तन संसार नावाच्या जिवंत भावनेत झालं होतं…
काही दिवसांनी प्रेरणा चा फोन…
“आई… अगं वहिनीची ट्रिक काम करून गेली…मी मशीन लँग्वेज काय सुरू केली अन सर्वजण माझ्याशी नीट वागू लागले..”
“मग..म्हटलं होतं ना..वाहिनी आहे तुझी…तिचं ऐक म्हणून..”
“म्हणजे आता मुलीपेक्षा सुनेचं कौतुक लागायला लागलं की तुला आता..”
“तू जशी माझी मुलगी तशीच ती”
श्वेता ने ते ऐकलं आणि तिचे डोळे भरून आले..
2 वर्षे अशीच गेली…
एक दिवस सोहम श्वेता ला म्हणाला..
“मी काय म्हणतो…आपण नवीन प्रॉडक्ट् लाँच करूयात ना आता..”
“कुठलं..”
“आपल्या दोघांचं..”
“म्हणजे??”
“म्हणजे…तू…मी..आणि आपलं तिसरं…”
“कोण तिसरं??”
श्वेता ला सोहम चा रोख समजला होता… पण मुद्दाम न समजल्याचा आव ती आणत होती..
हा विषय निघायचा तेव्हा मात्र श्वेता काहीशी गंभीर व्हायची.
आतापर्यंत संसार, नातीगोती तिने आत्मसात केलं.. पण एक गोष्ट तिने सोहम पासून लपवली होती..
आपण मूल होऊ द्यायचं नाही असं तिने आधीपासूनच ठरवलं होतं…मुलाच्या संगोपनात आयुष्याची कितीतरी वर्ष निघून जातात आणि आपलं भविष्य आपण घडवू शकत नाही असं तिला वाटे…
सासूबाईंनी सुद्धा तिला या बाबतीत थोडसं विचारलं..यावेळी मात्र तिने स्पष्ट सांगितलं..
“माफ करा…मी कसं सांगू तुम्हाला मला कळत नाहीये..”
“काय सांगायचंय.??”
“मला…आई व्हायचं नाहीये..”
सोहम चिडला..
“तुझं आत्तापर्यंत आम्ही सर्व
सहन केलं..तुला
साधं घरात काय
करतात, नाती काय
असतात, संसार काय
असतो हे माहीत
नव्हतं… आम्ही तुला
सांभाळून घेतलं..तुझ्या
प्रत्येक चुका पोटात
घातल्या…आणि तू?
फक्त स्वतःचाच विचार
करतेय…आम्हाला काय
हवंय याचा विचार
केलास कधी? पास्तावलो
मी तुझ्याशी लग्न
करून..”
आज पहिल्यांदा दोघांत इतका
वाद झाला होता..तेही सासूबाईंसमोर…
श्वेता च्या कानात
सोहम चे शब्द घुमु लागले..
“पास्तावलो
तुझ्याशी लग्न करून..”
श्वेता खोलीत जाऊन
रडू लागली..
“खरंच मी अशी
आहे म्हणून काहीच
उपयोगाची नाही का?
माझा काहीच उपयोग
नाही का? मी घरासाठी काहीच केलं
नाही का??”
ती स्वतःला अपराधी समजू
लागली…संसाराची पहिली
झळ तिला बसली
होती..
पण आता सासूबाईंनी
कसोटी होती..
टेक्निकल भाषेत अपत्य
का होऊ द्यायचं
हे समजवण्याची…
“श्वेता,
इकडे येतेस का
जरा.”
सासूबाईंनी हाक मारली..
सोहम आणि श्वेता
च्या भांडणामुळे घरात
वातावरण तसं खराबच
झालेलं…श्वेता ला
वाटलं आता सासूबाई
सुद्धा मूल होऊ देण्यासाठी मला समजावणार…थोड्या नाराजीतच
ती गेली..सासूबाई
म्हणाल्या…
“तुला एक नवीन
चॅलेंज..”
“कुठलं??”
“Kotlin नावाची
प्रोग्रामिंग लँग्वेज तुला शिकायचीए..”
श्वेता ची कळी
खुलली, बाळाचा विषय
नाही काढला हे
पाहून तिला जरा
बरं वाटलं..
“Kotlin?”
“हो…आता त्याच
लँग्वेज ला जास्त
स्कोप आहे…”
श्वेता एकदम उत्साहात
तयार झाली..तिला
असं नवनवीन शिकायला
आवडायचं…
पण शिकताना खूप अडचणी
आल्या…थोडा त्रास
झाला..कधी कधी ती अगदी
वैतागून जायची…पण
सासूबाईंना शब्द दिला
होता..
Khupach Sundar
Very nice, amazing, no word for your knowledge and imagination , simply great, keep writing