सासुबाई तिची मेहनत कौतुकाने पाहून निर्धास्त झाल्या..
उद्या पाहुणे येणार म्हणून सासूबाईंनी काही तयारी केली, त्या दमल्या आणि दुपारी जरा पहुडल्या…
अचानक दारावरची बेल वाजली..श्वेता दार उघडेल असं त्यांना वाटलं, पण ती काही बाहेर आली नाही..शेवटी सासूबाई स्वतः उठल्या आणि बघतो तर काय…
पाहुणे एक दिवस आधीच हजर…
डोक्यावर पांढरी टोपी घातलेले 2 आजोबा, नऊवारी साडीतील 3 आज्जी..ओठापासून वर एक मिलिमीटर अंतर बाकी असलेला शेम्बुड आलेला लहान मुलगा…डोक्यावर पदर घेऊन तिरक्या डोळ्यांनी पाहणारी 1 बाई आणि नकतेच लाल पिचकारी मारून आलेले 2 पुरुष…
त्या सर्वांना अचानक आलेलं पाहून सासूबाईंना घाम फुटला, त्यांनी चटकन डोक्यावर पदर घेतला आणि त्यांच्या पाया पडल्या…
ते आले…हॉल मध्ये बसले..
“सुनबाई दिसत नाही..”
सासूबाई आता पुरत्या घाबरल्या…
सगळी मेहनत वाया गेली…सगळं हातातून गेलं…असं समजत सासूबाई श्वेता ला हाक देणार इतक्यात किचन मधून श्वेता पाण्याचा ग्लासेस चा ट्रे घेऊन आली…काठापदराची साडी…डोक्यावर पदर..गळ्यात मंगळसूत्र… कपाळावर मोठी टिकली, जोडवे, बांगड्या, सोन्याचे कानातले….सासूबाई बघतच राहिल्या…
श्वेता ला अश्या टिपिकल अवतारात पाहून सासूबाई गोंधळल्या…श्वेता ने सर्वांना पाणी दिलं… सासूबाई म्हणाल्या…
“जा चहा ठेव…”
“कुठे ठेऊ??”
श्वेता ने प्रतिप्रश्न केला तसा पाहुण्यांपैकी 2 जणांना पिता पिता ठसका आला…सासूबाईंनी ते डोळेच बंद केले..इतक्यात समोर बसलेली आजी म्हणाली..
“फार विनोदी आहे हो तुझी सून…”
सर्वजण हसायला लागले…
त्यांचा मते श्वेता ने विनोद केला होता..पण श्वेता ने खरोखर साळसूदपणे तो प्रश्न विचारला…
“आलेच मी..”
सासूबाई श्वेता ला घेऊन आत गेल्या…चहा ठेवला… आणि श्वेता ला नेऊन द्यायला सांगितला…
आतापर्यंत सर्व सुरळीत चालू होतं…पण पाहुण्यांनी आता त्यांच्या सवयी दाखवायला सुरू केलेलं… आजोबांनी खोकलून खोकलून घर दणाणून सोडलं होतं…आज्यांनी घरभर तपकीर सांडून ठेवली..लहान मुलांनी घरभर घाण करून ठेवली..
त्यांच्यातली एक इंदू आजी श्वेता जवळ आली, त्यांनी श्वेता ला नखशिखांत न्याहाळलं..आजोबा मंडळी श्वेता ला एकेक ऑर्डर सोडत होते…लहान मुलं श्वेता कडे सारखं खायला मागू लागली…
त्यांच्यातली एक सून श्वेता च्या मदतीला आली…आणि हळूच कुजबुज करू लागली..
“फार करावं लागतं माय तुला..कसकाय सहन करतेस गं??”
“मला तर तसं काही वाटलं नाही…सिम्पल algorithm आहे कामांचा..”
“आं??”
त्या बाईला काही कळलं नाही..
“सासूची जातच अशी असते…आता तुला कामाला जुंपून स्वतः मस्त बसल्या आरामात…”
त्या दोघी सून नावाच्या एकाच कॅटेगरीमध्ये असल्याने सासूच्या चुगल्या करता येतील असं त्या बाईला वाटलं..पण तिला काय माहीत, श्वेता कुठल्या कॅटेगरी मधली होती ते…
“तसं नाही..object oriented वागणं आहे त्यांचं… त्यातलं polymorphism नुसार वागताय त्या…योग्य ठिकाणी योग्य भूमिका….”
“आं? म्हंजी?”
“A person at the same time can have different characteristic. Like a man at the same time is a father, a husband, an employee. So the same person posses different behaviour in different situations. This is called polymorphism..”
ती बाई हळूच बाजूला झाली…हे काही आपल्याला झेपणार नाही हे तिच्या लक्षात आलं…
श्वेता काही बोलत नसली तरी ती वैतागली होती… तिला पाहुण्यांचा थोडा त्रास होऊ लागला..सासूबाईंनी हे ओळखलं…
दुपारी सर्वजण आराम करत होते, श्वेता आपल्या खोलीत काम करत बसली होती…सासूबाईंनी घरातलं वायफाय बंद केलं…श्वेताला प्रश्न पडला, नेट का गेलं असेल? ती वायफाय चेक करायला गेली…
“वायफाय कुणी बंद केलं?”
“मी केलं..” सासूबाई म्हणाल्या…
श्वेता ला कारण कळलं नाही…
सासूबाईंनी समजावलं..
“जोपर्यंत हे वायफाय चालू असतं तोवर आपल्याला त्याची किंमत कळत नाही..पण कनेक्शन बंद झालं की मग आपण एकटे पडतो, आपला जगाशी संपर्क तुटतो…
ही गावाकडची मंडळी तशीच आहेत..तुझ्या सासऱ्यांना शिकण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा याच लोकांनी त्यांना मदत केली…स्वतः अजूनही खेडेगावात राहतात, पण दुसऱ्यांनी प्रगती करावी म्हणून मदतीला कायम तयार असतात…यांच्यामुळे आपलं गावाकडचं कनेक्शन ऑन राहतं… आपली नाळ गावाशी जोडून राहते, ती जर तुटली तर आपण एकटे पडू…वायफाय आपल्या लहरींनी प्रत्येकाला जोडून घेतं…अगदी अंतराची मर्यादा ओलांडून योग्य ती सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवतं…गावाकडच्या मंडळींचा थोडा त्रास होईल तुला, पण…”
“हे कनेक्शन कधीच बंद होऊ देणार नाही मी…वचन देते आई तुम्हाला…”
सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं..श्वेता आता वैतागत नव्हती…सर्व पाहुण्यांचं आपुलकीने आणि कृतज्ञतेने करत होती…
स्वयंपाक बनवतांना सासुबाई श्वेता ला मदतीला घेत होत्या… शिरा करतांना वेलदोडे घेतले, त्यातले दाणे बाजूला केले आणि ते खलबत्त्यात कुटायला घेतले..
“एक query आहे..”
“विचार..”
“आपण दाणे काढण्यापेक्षा अख्खे वेलदोडे जर कुटून टाकले तर??”
प्रश्न गंभीर होता…
सासुबाई विचार करतात…आणि म्हणतात..
“Bad user experience…”
“Ohh…”
वेलदोडे अख्खी टाकली तर वरचं साल पूर्ण बारीक होत नाही..खातांना ते जाणवतात…कडक लागतात…
“म्हणजेच bad user experience…”
“Right…”
पाहुणे जेवतात, जेवणाचं आणि सुनेचं तोंडभरून कौतुक करतात…आजी श्वेता ची दृष्ट काढतात…
“खरंच गुणाची हाय तुझी सून…”
असं म्हणत ते निरोप देतात…
संध्याकाळी सर्वजण हॉल मध्ये बसलेले असताना श्वेता गावाकडे फोन लावते…
“पोहोचले ना नीट? प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना?”
श्वेता ने त्यांचा नंबरसुद्धा घेऊन ठेवलेला..आणि फोन करायचं माझ्याही डोक्यात नाही आलं ते श्वेता ने केलं..सासूबाईंना अजून कौतुक वाढलं…
श्वेता ने फोन ठेवला तशी ती म्हणाली..
“Final phase in progress … Maintenance…”
श्वेता चा संसार सासुसोबत तर मजेत चालला होता, पण तिचा नवरा सोहम सुद्धा या सर्व गोष्टी एन्जॉय करत होता. पण कितीही झालं तरी प्रेम टेक्निकल भाषेत करता येत नाही, त्याला प्रेमाचीच भाषा लागते. सोहम साठी ती सगळं काही करत होती…पण ड्युटी म्हणून. एकदा सोहम ने विचारलं, “तुझ्यासाठी मी कोण आहे?”
“My husband..”
“तसं नाही गं… माझ्याबद्दल तुला काय वाटतं?”
Khupach Sundar